ग्रामपंचायत कार्यालयास संतप्त ग्रामस्थांनी टाळे ठोकले!…
संगमनेर:
अंभोरे ता.संगमनेर जि.अहमदनगर येथिल ग्रामविकास अधिकारी श्री.अरुणकुमार जेजुरकर हे ग्रामविकास अधिकारी म्हणून अंभोरे येथे कार्यरत आहे.त्यांचा कार्यकाळ अत्यंत वादग्रस्त ठरला असुन अकार्यक्षम अधिकारी म्हणून नाव झाले आहे.स्वत:च्या मर्जीने ग्रामपंचायत कार्यलयात बाहेरील गावच्या महिला कर्मचारी वरिष्ठांची,ग्रामपंचायत पदाधिकारी यांना विश्वासात न घेता परस्पर नियुक्त केले.कार्यालयिन वेळेत कार्यालय न उघडता स्वत:च्या मर्जीने कधी दुपारी 12 वा.उघडणे तर कधी सायंकाळी 7 वा.उघडणे रात्री 2 पर्यंत कार्यालय सुरू ठेवणे,महिला कर्मचारी यांना रात्री अपरात्री फोन करणे,ग्रामपंचायत  ठेकेदार यांना आर्थिक त्रास देणे,ग्रामस्थांकडून चुकिच्या पध्दतीने कर वसुली करणे,ग्रामस्थांनी घरपट्टी,पाणी पट्टी भरलेली असतांना देखील पुन्हा बाकी वसुलीसाठी तगादा लावणे,कराची बाकी भरल्याची पावती न देणे, कराची बाकी स्वतच्या फोन पे वरती करण्यास सांगणे,अनेक गावच्या ग्रामस्थाकडून की जे कामानिमित्त मुंबई,पुणे,नाशिक,बाहेर गावी राहतात त्यांचा फोन नंबर मिळवून त्त्यांचेकडून फोन पे वर  बेकायदेशीर वसुली करणे,पाच हजार बाकी असतांना ग्रामस्थांकडून दहा हजार वसुल करणे त्याची पावती नंतर घेउन जा असे म्हणून पावतीच न देणे,घरकुल लाभार्थीची आड़वणुक करणे,ग्रामपंचायत खात्यावर पैसे शिल्लक नसल्याने त्याच खात्याचा चेक देणे,पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांचा मान सन्मान न ठेवता मीच मालक या आविर्भावात वावरणे,मी ग्रामसेवक संघटनेचा पदाधिकारी असुन माझे कोणी वाकडे करू शकत नाही अशी अर्वाच्च भाषा वापरणे,ग्रामपंचायत कार्यालयातील मंजूर कामे स्वत:च्या मर्जिनुसार करणे,दलित,आदिवासी समाजाचा निधी इतरत्र वळवीने.अशा अनेक  ग्रामविकास अधिका-याच्या या कारनाम्याने ग्रामस्थ,पदाधिकारी,महिला ग्रामस्थ हैराण झाले असुन या अधिका-याची मुजोरी एवढी वाढली की,कोणी विचारणा केली तर त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा 353 चा खोटा गुन्हा दाखल करुण ग्रामस्थांना वेठीस धरण्याचे काम चालू आहे.याबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती संगमनेर,मा.मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर,मा.आयुक्त नाशिक,यांना वेळोवेळी लेखी अर्ज,पत्रव्यवहार करुन देखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही अद्याप झालेली नाही.त्यामूळे या अधिका-याची मुजोरी अधिक वाढली असुन अंभोरे गावातील शांतता धोक्यात आली आहे.यामुळे गावच्या ग्रामस्थ,महिला,ग्रामस्थांनी संतप्त होउन ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकले असुन लवकरात लवकर नवीन ग्रामविकास अधिकारी देवून होणा-या समस्या दुर कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.मागणी पुर्ण न झाल्यास अंभोरे येथिल ग्रामस्थ लवकरच अंदोलन करतील त्यानंतर होणा-या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहिल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!