*मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा अभियानांतर्गत महालक्ष्मी विदयालय पिंपळगाव नाकविंदा तालुक्यात दुसरे*.

पिंपळगाव नाकविंदा/ लोकवेध live न्यूज

अकोले तालुक्यातील आदिवासी डोंगराळ भाग म्हणून ओळखले गेलेल्या अगस्ती रूरल एज्युकेशन सोसायटीचे महालक्ष्मी माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय पिंपळगाव नाकविंदा या विदयालयाने मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानांतर्गत तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अहमदनगर,पंचायत समिती यांचे मार्फत तालुकास्तरीय मुल्यांकन समिती यांनी प्रत्यक्ष तालुकास्तरीय तसेच केंद्रस्तरीय तपासणी केली.या मुल्यांकन समितीने विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील,व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग,शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम,विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती,शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता,राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम,विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन,आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास,प्लास्टीक मुक्त शाळा,व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठीचे मार्गदर्शन व्याख्यान,गुणवत्ता विकास,भौतिक विकासात सहभाग,तंबाखू मुक्त शाळा, उत्कृष्ट पोषण आहार,शाळा व्यवस्थापन समिती,एनजीओ सहभाग,पालक मित्र,माजी विद्यार्थी सहभाग आदि बाबनिहाय गुणदान करण्यात आले.यामध्ये सदर विदयालयाने तालुकास्तरावर उच्चांक गुण मिळवत दुसरा क्रमांक पटकविला आहे.अशी माहीती विद्यालयाचे प्राचार्य सुनिल धुमाळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
अकोले तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,सर्व आश्रमशाळा हे या स्पर्धांत सहभागी होते.या सर्व शाळांमध्ये महालक्ष्मी विद्यालयाने ग्रामीण भागात शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.या विद्यालयात माध्यमिक विदयालयात ३००व उच्च माध्यमिकमध्ये १०० असे एकूण ४०० विद्यार्थी शिक्षण घेतात. आदीवासी भागातील हे सर्वात मोठे विद्यालय म्हणून ओळख आहे.
या विशेष निवडीबद्दल विद्यालयाचे प्राचार्य,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विदयार्थी, पालक यांचे गटशिक्षण अधिकारी अभयकुमार वाव्हळ, शिक्षण विस्तार अधिकारी सविता कचरे,केंद्रप्रमुख देवेंद्र आंबेटकर, संस्थेचे अध्यक्ष अॅड.वसंतराव मनकर,सचिव मंगेश नवले, कार्यकारणी सदस्य बबनराव आभाळे, भाऊसाहेब कासार,विनोद हांडे,प्रमोद मंडलिक, सरपंच लक्ष्मण सोंगाळ,उपसरपंच मारूतीपाटील काळे, आजी,माजी सदस्य, सरपंच,उपसरपंच,स्थानिक स्कुल कमिटीचे अध्यक्ष मारूती आभाळे,राम लगड सर जालिंदर धुमाळ यांसह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!