विद्यार्थ्यांमधील कलागुण शोधणारे शिक्षक समाजासाठी आदर्श असतात – सुधाकर मुंगसे

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

शिक्षक हे समाजाचे शिल्पकार आहे. विद्यार्थ्यांमधील कलागुण शोधून त्यांचे व्यक्तिमत्व विकसित करणारे शिक्षक समाजासाठी नेहमी आदर्श असतात असे गौरवोद्गार माजी तालुका मास्तर आदर्श शिक्षक सुधाकर मुंगसे गुरुजी यांनी तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीप्रिय शिक्षक बाजीराव गायकवाड सर (नाना) यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र भालारे, माधव हासे, शिक्षक बँकेचे संचालक भाऊराव राहींज, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. त्रिंबक गडाख , माजी सरपंच भिमराज चत्तर ,विकास मंडळाच्या संचालिका मनीषा गाढवे, केंद्रप्रमुख भाऊसाहेब नागरे, सखाराम माळी , मिलिंद पावबाके , शुभम काठे , बाळू आत्रे , अशोक गडाख , प्रकाश मुंगसे , इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्ती बाजीराव गायकवाड व सौ सुमन गायकवाड यांचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला . याप्रसंगी कुमारी श्रुती गडाख, स्वरा गडाख, प्रतीक्षा गडाख, सौ. नम्रता पावबाके यासह शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र भालारे साहेब, माधव हासे, ॲड. त्रिंबक गडाख, लोकपंचाय संस्थेचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते सारंग पांडे,कैलास वर्पे , विमल रहाणे , आश्विनाथ विदयालयाचे मुख्याध्यापक डि.स. गडाख , परशराम सोनवणे , केंद्रप्रमुख उत्तम गायकवाड ,आदींनी बाजीराव गायकवाड गुरुजींच्या चांगल्या कामाविषयी विचार मांडत त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पारेगाव बु शाळेचे माजी मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुधाकर मुंगसे गुरुजी यांनी वीस हजार रुपये किमतीचे प्रिंटर मशीन शाळेसाठी भेट दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा भालेराव मॅडम यांनी केले. नंदकिशोर राहाणे यांनी सूत्रसंचालन करून प्रा.गुलाब गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक सुखदेव इल्हे, नंदू कुडेकर, केशव बाळसराफ, अनिता सूर्यवंशी, जयश्री चव्हाणके आदींसह विद्यार्थी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ व शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!