योग्य व्यक्तीची साथ मिळाली की माणूस योग्य वाटेवर चालतो-प्रा.डॉ.सुनिल शिंदे.
कातळापूर विद्यालयात १०वी विदयार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न.
राजूर / लोकवेध live न्यूज
पुत्र व्हावा ऐसा गुंडा,त्याचा तिही लोकी झेंडा याप्रमाणे माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार.चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करत असतात.म्हणूनच योग्य व्यक्तीची साथ मिळाली की,माणूस योग्य वाटेवर चालतो.असे विचार प्रा.डॉ.सुनिल शिंदे यांनी प्रतिपादीत केले.
सत्यनिकेतन संस्थेचे नानासाहेब विठोबा देशमुख सर्वोदय विदया मंदिर कातळापूर येथे इ.१०वीच्या विदयार्थ्यांचा सदिच्छा समारंभ मुख्याध्यापक बादशहा ताजणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.शिंदे विचारमंचावरून बोलत होते.
डॉ.शिंदे यांनी पुढे मार्गदर्शन करताना, आयुष्य जगताना आपली मिळकत फक्त आर्थिक संपत्ती नसते.अनुभव, विश्वास,नाती,इतरांच्या नजरेत मान, सन्मान,आपली उत्तम वाणी,चांगले विचार हिच आपली कमवलेली खरी मिळकत असते.विश्वासाच्या पायावर उभे असलेले स्वप्न अपयशाला घाबरत नाही.तुमच्या यशाची उंची तुमचा प्रामाणिकपणा आणि मेहनतीवर अवलंबून असते.कारण प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बादशहा ताजणे यांनी काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडू नका.उदयाच सुख त्यालाच अनुभवायला मिळत जो आजच्या परिस्थितीशी संघर्ष करतो.ध्येयापर्यंत पोहचण्याचा प्रत्येकाचा मार्ग व वेळ नक्कीच वेगवेगळी असू शकते.त्यासाठी संयम बाळगा. स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असावी.घडने व बिघडने दोन्हीचे वय एकच असते.ठरवणे गरजेचे आहे.आम्ही घडलो,तुम्ही बी घडाना.चुकातून माणून घडतो.मायेचा हात देणारे पाहीजे.खचून जाऊ नका.असे विचार प्रतिपादीत केले.
विदयार्थी दत्तु खाडगिर,मयुर शिंदे, लक्ष्मी कातडे,करण ढगे,रोहित धोंगडे यांनी विदयालयाप्रती मनोगत व्यक्त केले.
शिक्षक सचिन लगड,संपत धुमाळ,अनिल पवार,गोरक्ष मालुंजकर,धनंजय मोहंडूळे,अनिता जंबे,मिना गाडे आदींनी मार्गदर्शन करत बोर्ड परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या.
विदयार्थ्यांनी विदयालयाप्रती ऋण व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी,विद्येची देवता सरस्वती माता यांची प्रतिमा भेट दिली.
अध्यक्ष सुचना विदयार्थी रितेश गावंडे याने मांडली.या सुचनेस दत्तु खाडगिर याने अनुमोदन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत किशोर देशमुख यांनी केले.
सुत्रसंचलन विदयार्थी रोहित धोंगडे याने केले तर संपत धुमाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सुरुवाद स्वागतगिताने करण्यात आली.प्रारंभ पसायदानाने करण्यात आला.यावेळी सर्वांसाठी स्नेहभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
