एलिट क्लब नाशिकने जागतिक एन.जी.ओ दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवत केला साजरा

नाशिक / लोकवेध live न्यूज / निलेश शेकोकार 

 

27 फेब्रुवारी हा दिवस जागतिक एन.जी.ओ. दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या अनुषंगाने, रविवार २५ फेब्रुवारी रोजी सुखप्रद फाउंडेशन संचालित एलिट क्लब व वृक्षीत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक उपक्रम प्रत्यक्षात राबवून साजरा करण्यात आला. या उपक्रमात नाशिक सायकलीस्ट फाउंडेशन , उमीद फाउंडेशन, रोटरॅक्ट नाशिक नाईंहिल्स क्लब, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, किरण विकास ग्रुप, यू बी ए टी , गरुड झेप प्रतिष्ठान , भूमी फाउंडेशन, मानवता हेल्प फाउंडेशन, अश्या अनेक सामाजिक संस्थांनी आपला सहभाग नोंदविला*
सकाळी ठीक सात वाजता इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथे सर्व सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित झाले. प्रत्येक संघटनेने आपल्या संस्थेची व कार्याची थोडक्यात माहिती दिली व तसेच प्रत्येक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा एलीट क्लब कडून रोप व वृक्षित फाउंडेशन कडून इको फ्रेंडली भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून “जागृत नाशिक, जागृत भारत “चे प्रवर्तक स्वामी श्रीकंठानंद हे उपस्थित होते. या निमित्ताने स्वामीजींचे मोलाचे मार्गदर्शन सर्वांना लाभले. सामाजिक उपक्रमाची सुरुवात संगीताच्या तालावर सामुदायिक फ्लॅश मॉब करुन करण्यात आली. मानवता हेल्प फाउंडेशनचे रवींद्र दुसाने यांनी अवयवदाना बद्दल इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथे जनजागृती केली*.
*त्यानंतर सर्व उपस्थित स्वयंसेवकानी गट बनवत आपल्या उपक्रमासाठी प्रस्थान केले. पहिल्या गटा कडून भारत नगर येथील नाल्याच्या किनारी अस्वच्छता असलेल्या ठिकाणी स्वच्छ्ता मोहीम रबविण्यात आली. दुसऱ्या गटा कडून कृपाप्रसाद मुलींचं वसतिगृह येथे सॅनिटरी नॅपकीन वाटप व जागरूकता करण्यात आली. तिसऱ्या गटा कडून गरजुंसाठी इंदिरानगर व एक्स्प्रेस इंनन जवळील झोपडपट्टी येथे कपडे वाटप करण्यात आले व तसेच इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक चे अध्यक्ष अवधूत कुलकर्णी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून “पर्यावरण संवर्धनासाठी सायकलचा वापर करा” हा संदेश घेऊन नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन कडून सायकल रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीची सांगता कृपाप्रसाद मुलींचे वस्तीगृह येथे झाली. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या उपाध्यक्ष डॉ. मनिषा रौंदळ, संचालिका माधुरी गडाख, सक्रिय सदस्य मोहन देसाई, साधना दुसाने, अजय सिंग, वृषाली हिरे, पुष्पा सिंग, संदीप भानोसे यांनी “वाहतूक सुरक्षा जीवन रक्षा” या विषयावर प्रबोधनात्मक पथनाट्य सादर केले
*या वेळी एलिट क्लब चे संस्थापक तेजस शिरसाठ, अनुराग कापडणीस, पायल भामरे, श्रुती भाभड, वेदार्थ खांदवे, ओमकार खुर्दल, आयुष जाधव,श्रुती जाधव , कशिष इनामदार व इतर सर्व संस्थांचे पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते*.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!