मंजाबापू साळवे यांची संगमनेर शिवसेना (शिंदे गट ) तालुका मागासवर्गीय सेल च्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती
पिंपरणेतील शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील सामाजिक कार्यकर्ते मंजाबापू साहेबराव साळवे यांच्या कामाची दखल घेत शिवसेना ( शिंदे गट ) पक्षाने संगमनेर तालुका शिवसेना मागासवर्गिय सेल तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली
संगमनेर तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला यावेळी त्यांनाही पत्र देण्यात आले
शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांच्या हस्ते साळवे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
साळवे यांनी आत्तापर्यंत अनेक पद भूषवलेले आहेत सामाजीक कामातुन स्वतःचा तालुक्यात व गावत ठसा उमटावत गावात तरूणाचे चांगले संघटन करून एकोपा निर्मान केला तसेच गावात दारूबंदी ,विविध विकास कामे केले असून काही सुरू आहे त्यांच्या कामाची दखल घेत शिवसेनापक्षाने संगमनेर तालुका शिवसेना मागासवर्गीय सेल च्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
नियुक्तीचे पत्र देताना खासदार सदाशिव लोखंडे शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी भाऊसाहेब चौधरी राजेंद्र चौधरी शिवसेना जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते विठ्ठल घोरपडे सोमनाथ भालेराव कोंडाजी कडनर आदी सह शेकडो युवक कार्यकर्ते उपस्थित होते खासदार सदाशिव लोखंडे यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी साळवे म्हणाले की शिवसेना पक्षाने मला पद देऊन माझ्यावर जो विस्वास दाखवला तो मी माझ्या कामातून सिद्ध करून दाखविल तसेच शिवसेना पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्यांपर्यंत पोहचवण्याचे काम करून पक्ष वाढीसाठी मनापासून खुप प्रयत्न करीन युवा कार्यकर्ते यावेळी उपस्थीत होते.
