देशात पुन्हा मोदी सरकार आणायचे आहे – सौ शालिनीताई विखे पाटील
मालुंजेत महिला दिन व विकास कामांचा उद्घाटन समारंभ संपन्न
संगमनेर / लोकवेध live न्यूज

बचत गटांच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचे काम राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आपल्या गावातही संदीप घुगे सुवर्णा घुगे व घुगे परिवाराच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचे काम सुरू आहे महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरू करावेत महिलांनी बनवलेले प्रॉडक्ट बचत गटाच्या माध्यमातून विक्री करावेत प्रत्येकाचे काम हे मोदी सरकारच्या माध्यमातून होणार आहे महसूलमंत्र्यांच्या सांगण्यावरून उजव्या कालव्याला पाणी आले त्यामुळे या गावात आता हक्काचे पाणी आले येणाऱ्या लोकसभेत सुजय दादा उभे राहणार असून दक्षिणेकडे आपले पाहुणे असतील तर सुजय दादाला निवडून आणण्यासाठी मदत करा असे आवाहन केले आपण सर्वांनी मिळून पुन्हा मोदी सरकार या देशात आणायचे आहे आपले विखे पाटील अरे परिवारावर खूप प्रेम आहे असेच यापुढेही राहू द्या असे प्रतिपादन सौ शालिनीताई विखे पाटील यांनी केले
संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावात महिला दिन व विविध कामांचा उद्घाटन समारंभ अतिशय थाटामाटात पार पडला याप्रसंगी त्या बोलत होत्या
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यां म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील ह्या होत्या

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांचे जेसीबी द्वारे फुले उधळत तसेच क्रेनच्या साह्याने जम्बो हार घालून भव्य दिव्य आणि आगळे वेगळे स्वागत करण्यात आले त्यानंतर शालिनीताई विखे यांची पेढे तुला करण्यात आली त्यानंतर त्यांच्या शुभ हस्ते ग्रामपंचायत कार्यालय तसेच 16 कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन संपन्न झाले गावात झालेल्या कार्यक्रमात बचत गटांना पीठ गिरणी, वजन काटे, पॅकिंग मशीन, रोजगार शेवई मशीन, गहू दळणे मशीन, तसेच बचत गटाच्या महिलांना सायकल वाटप करण्यात आली महिला दिनानिमित्त बचत गटाच्या महिलांना सन्मानचिन्ह देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला प्रधानमंत्री योजनेच्या पूर्ण झालेल्या घरकुलांच्या लाभार्थ्यांना चाव्या देण्यात आल्या आयुष्यमान भारत कार्डाचे वाटप करण्यात आले तसेच जिल्हा परिषद शाळेत इंटरॅक्टिव्ह बोर्ड देण्यात आला हंगेवाडी ते मालुंजे हजारवाडी रस्ता म्हणून मालुंजे ते गोसावी फाटा रस्ता मालुंजे ते चौधरी वस्ती रस्ता हे रस्ते पूर्ण झाले त्यांचे उद्घाटन संपन्न झाले राष्ट्रीय जल पेयजल योजना पूर्णत्वास येत असून ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न लवकर सुटणार आहे असे सांगण्यात आले गावात मराठी कार्यालयाच्या इमारतीचे काम सुरू असून तीही लवकरात लवकर ग्रामस्थांच्या सेवेत लोकार्पण होईल

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप घुगे यांनी केले
माजी सरपंच संदीप घुगे म्हणाले की की गावात विकास कामांचा पूर सुरू आहे राधाकृष्ण जी विखे साहेबांच्या माध्यमातून पाट पाण्याचा प्रश्न निकाली लागला गावाला हक्काचे पाणी मिळवून मिळू लागले आहे गावात 16 कोटी ची काम मंजूर होऊन पूर्णत्वास आले आहे यापुढेही विखे कुटुंबांच्या माध्यमातून आपली अनेक कामे होणार आहेत आपण सर्व गाव मिळून विखे पाटलांच्या मागे समर्थपणे उभे राहू अशी गावच्या वतीने ग्वाही देतो
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत लोकनियुक्त सरपंच सुवर्णा घुगे गुलाबराव सांगळे पोपटराव वाणी ताबाजी मुंतोडे जेऊर शेख सुनील जोशी ग्रामसेविका रूपाली काहाने, रवीना खरात,दिपाली खरात मीरा घुगे संपत खरात आनंदा खरात सुखदेव खरात शशिकांत नागरे आशा खरात साधना खरात लता वाघ प्रवीण घुगे अशोक खेमनर शरद भालेराव संगीता खरात मंगल खंडागळे उषा निळे प्रसाद बुरकुल दीपक डोंगरे योगेश गाभणे दत्तू खरात ज्ञानदेव सांगळे ज्ञानदेव सोसे काशिनाथ सोसे डॉक्टर कहार दादा वाघ जनार्दन खरात भिमाबाई घुगे सरला नागरे शिवाजी नागरे कैलास आंधळे आधी सह गावातील महिला पुरुष बचत गटातील महिला तसेच गावातील विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी आभार सरपंच सुवर्णाताई घुगे यांनी मानले
