भुकेलेल्याची कदर डोक्यावर पदर हीच खरी भारतीय मदर – ह भ प दत्तगिरी महाराज
 ब्रह्मलीन सद्गुरु माणिकगिरी महाराज पुण्यतिथी सप्ताहाची सांगता 
 पिंपरणे /लोकवेध live न्यूज 

स्त्री धर्म म्हणजे काय असतो तर स्त्रीने पतिव्रता असावे पतिव्रतेचा भाव पती तिचा देव  प्रत्येक स्त्रीला तिचा पती देव असला पाहिजे तिच्या डोक्यामध्ये दुसरा विषय नसावा पतीचा आदर सेवेला सादर भुकेलेल्याची कदर डोक्यावर पदर हीच खरी भारतीय मदर,  घरात आई गोठ्यात गाई शेतात भाई  अशा घरांमध्ये काहीच कमी होऊ शकत नाही ज्या ठिकाणी आईची पूजा केली जाते आणि आई सर्वश्रेष्ठ मानली जाते तिथे काहीच कमी पडणार नाही  परमेश्वराचे नामस्मरण करा तुमच्या जीवनात वाईट वेळच येणार नाही दिलेला आशीर्वाद आपल्यापासून कोणी हिरावून करून घेणार नाही. भगवंतावर मनापासून प्रेम करा असे प्रतिपादन दत्तगिरी महाराज यांनी  काल्याच्या किर्तन प्रसंगी केले

 संगमनेर तालुक्यातील वरवंडी येथे महाशिवरात्री व ब्रह्मलीन सद्गुरु माणिक गिरीजी महाराज यांची 15 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त रामेश्वर देवस्थान व ग्रामस्थ यांच्यावतीने  अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते
ह भ प  महंत दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ह भ प गणेश गिरी महाराज यांनी या सप्ताह चे नियोजन उत्कृष्ट केले होते माणिकगड वहिरा मठ वारकरी शिक्षण संस्थेच्या  विद्यार्थ्यांनी काल्याच्या कीर्तनात साथ दिली
 माणिकगड वाहिरा मठ वारकरी शिक्षण संस्थेमार्फत या ठिकाणी ह भ प महंत दत्तगिरी महाराज यांच्यावतीने हभप गणेशगिरी महाराज यांच्यामार्फत   गरीब व अनाथ मुलांना मोफत शालेय शिक्षण व वारकरी शिक्षण दिले जाते
या सप्ताह काळात रोज ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, काकडा, प्रवचन, धार्मिक कार्यक्रम पार पडले रोज रात्री 7 ते 9 कीर्तन सेवा पार पडली तसेच रोज संध्याकाळी कीर्तन संपल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होत असे
 मंगळवार दिनांक 12 रोजी सद्गुरु माणिक गिरीजी महाराज समाधी वर अभिषेक करून महापूजा केली नंतर महाआरती करण्यात आली  सायंकाळी ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता करण्यात आली बुधवार दिनांक 13 रोजी सकाळी दहा ते बारा ह भ प महंत दत्तगिरी महाराज यांचे काल्याचे किर्तन होऊन नंतर भाविकांना महाप्रसाद वाटण्यात आला आणि सप्ताहाची सांगता करण्यात आली यावेळी वरवंडी व परिसरातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!