भारत सरकारच्या नोटरी पब्लिकपदी ॲड. अविनाश गोडगे यांची नियुक्ती 

 संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 संगमनेर न्यायालयातील नामवंत वकील आणि वकील क्षेत्रात अनेकांना न्याय देणारे  संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील रहिवासी
 येथील रहिवासी प्रथितयश ॲड.अविनाश शिवाजी गोडगे  यांची भारत सरकारच्या नोटरीपदी नुकतीच निवड करण्यात आली. वकिलीच्या माध्यमातून गरीब दिन दुबळ्याना  न्याय देण्याचे काम करीत आहेत. अन्यायाविरुद्ध लढणारा वकील म्हणून गोडगे यांना ओळखले जाते. त्यामुळे भारत सरकारने ॲड अविनाश गोडगे यांची नोटरी पब्लिकपदी निवड करून हक्काच्या माणसाची वर्णी लावल्यामुळे सर्वत्र ॲड. अविनाश
गोडगे यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!