भाजपचा राज्यात महिलांवर अत्याचाराचे सत्र सुरूच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) महिला आघाडी अन्याय विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ….. शितल हासे 

संगमनेर  / लोकवेध live न्यूज 

 

आज दिनांक 21 मार्च 2024 रोजी शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख शितल ताई हासे उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी आशाताई केदारी शहर प्रमुख महिला आघाडी संगीताताई गायकवाड उपतालुकाप्रमुख वैशालीताई वडतले तसेच शिवसेना युवासेना अंगीकृत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने संगमनेर पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ जी वाकचौरे साहेब यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनात खालील प्रमाणे मागणी करण्यात आली
प्रति ….पोलीस उपविभागीय अधिकारी साहेब सोमनाथ जी वाघचौरे
अर्जदार …शितल सदाशिव हासे महिला आघाडी तालुकाप्रमुख संगमनेर
विषय ..साकुर येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून आत्महत्येस प्रउत्त करणाऱ्या नराधमास लवकरात लवकर शिक्षा व्हावी

महोदय
आम्ही सर्व महिला आघाडी, शिवसेना, युवासेना ,तसेच सर्व अंगिकृत संघटनाचे संगमनेर तालुक्यातील पदाधिकारी आहोत साकुर येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली एका पान शॉप मध्ये अल्पवयीन मुलीवर एका युवकाने बलात्कार केला व त्याला चार युवकांनी मदत केली सदर घटना असह्य झाल्याने सदर अल्पवयीन युवतीने आत्महत्या केली सदर घटनेचे पोळ महाराष्ट्र भर सुरू झालेले आहे सदर घटना अतिशय गंभीर स्वरूपाची व निंदनीय स्वरूपाची आहे तरी सदर घटनेतील आरोपी आपण अटक केलेले असून त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करून सदर खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवून त्यांना गंभीर शिक्षा करावी जेणेकरून यापुढे युवती व महिलावर अन्याय होणार नाही याची दक्षता देखील आपण घ्यावी सध्या महाराष्ट्रात भाजप व मिंदे सरकार आहे या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील अनेक युवती व महिलावर दिवसाढवळ्या अन्याय होत आहे सदर अन्यायाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही व वेळेप्रसंगी जशास तसे उत्तर देखील दिले जाईल कृपया सदर निवेदनाचा आपण गांभीर्याने विचार करावा व आमच्या सामूहिक तीव्र भावनेचा विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही विनंती यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण तालुकाप्रमुख संजय फड माजी तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे युवा सेनेचे अमोल डुकरे अक्षय गाडे राजू सातपुते वाहतूक सेनेचे शहर प्रमुख इम्तियाज शेख शिवसेनेचे मा शहर प्रमुख अमर कतारी रिक्षा सेनेचे अशोक बडे भगवान पोपळघट प्रशांत खजुरे त्रिलोक कतारी दीपक जी साळुंखे सचिन साळवे
राहुल ढोरे पप्पू पवार विजय कोटकर योगेश निकाळजे सदाशिव हासे युवा सेनेचे अक्षय गुंजाळ आधी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!