लोकसभेसाठी भाजपाची महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, रक्षा खडसे , डॉ सुजय विखे पाटील जळगाव मधून स्मिता वाघ यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश
मुंबई / लोकवेध live न्यूज
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, रक्षा खडसे , डॉ सुजय विखे पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. नितीन गडकरी यांना नागपूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. रावेरमधून रक्षा खडसे यांना तर अहमदनगर मधून डॉ सुजय विखे पाटील , दिडोरीतून भारती पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देवून त्यांचा वनवास संपविला मात्र बहिण प्रितमचं काय ?
