आजोबा मतदानाला यायचं हं!’… जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्यांकडून ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचे आवाहन
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
‘मतदान करा, मत ताकद आहे’, ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ आपल्या मताचे दान आहे लोकशाहीची शान, भ्रष्टाचाराला घालूया योग्य उमेदवार देऊया अशा घोषणा देत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संगमनेर तालुक्यातील पिंपरणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी केली मतदान जनजागृती विद्यार्थी गावातील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचले आणि ‘आजोबा मतदानाला यायचं हं!’ असे म्हणत त्यांना जागरुक नागरिक या नात्याने मतदान करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद दिनानिमित्त भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या प्रतिमेला अपयरा अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी गावातून मतदान जनजागृती प्रभात फेरी काढली मतदान जनजागृती च्या घोषणा दिल्या
ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शिक्षक मतदान जागृती उपक्रमात उत्साहाने सहभागी होत शिक्षक अभिनव संकल्पना राबवून विद्यार्थ्यांचे कलागुण आणि मतदान जागृतीचा सुरेख समन्वय साधताना दिसले घोषवाक्यांचे रंगीत फलक तयार करून छान वातावरण निर्मिती केली
विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांना नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला . देशाची भावी पिढी लोकशाही बळकट करण्यासाठी मोहिमेला निघालेली पाहून पिंपरणे गावचे सरपंच नारायण मरभळ, ग्रामसेवक अशोक कुदळ निलेश बागुल व ग्रामस्थांनाही विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले
उपक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय बोर्से जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मंदाकिनी मोदड, प्रतिभा दूर्गुडे, मंदादेवी गवारी, अनिता मुरडनर,सरला सातपुते ,प्रदिप बागुल, पांडुरंग गळंगे आदी सह विद्यार्थी व ग्रामस्थ सहभागी झाले.
