सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालय डिग्रस लोकशाहीचा जागर अंतर्गत घोषवाक्य व गीतगायन स्पर्धा
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
लोकशाहीचा जागर उपक्रमांतर्गत आज विद्यालयात या स्पर्धेमध्ये इयत्ता सहावी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला व आपल्यामध्ये असणाऱ्या कौशल्य अंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्लोगन तयार करून त्याद्वारे समाज प्रबोधन करण्याचे कार्य केले.
मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो
नवे वारे नवी दिशा मतदानाचा आहे उद्याची आशा
ताई माई अक्का मतदान चुकू नका या आणि अशा अनेक स्लोगन च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जनजागृती केली
त्याचप्रमाणे इयत्ता सहावीतील विद्यार्थिनीनी बनो देश के भाग्य विधाता अब तो जागो तुम मतदाता
सातवीतील विद्यार्थिनीनी अपने अधिकारो का सन्मान करे
आणि आठवीतील विद्यार्थिनीनी सळसळणाऱ्या रक्ताला या आले आज उधान या गीतांमधून
समाज प्रबोधन केले व मतदानाविषयी लोकांमध्ये जाणीव निर्माण करून देण्याचे काम केले.
या उपक्रमाविषयी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे शिक्षक श्री शेंगाळ विजय यांनी मार्गदर्शन केले व उपक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बाचकर सर दिवे सर खेमनर सर चिंधे मॅडम पुणेकर सर नेहे सर पुणेकर मामा यांनी विशेष सहकार्य केले
