मा. श्री. भाऊसाहेब संतुजी थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागर लोकशाहीचा, मतदार जनजागृती अभियान
पिंपरणे / लोकवेध live न्यूज 
संगमनेर तालुक्यातील कनोली येथील  मा. श्री. भाऊसाहेब संतुजी थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात “” जागर मतदानाचा ” या अभियानांतर्गत सकाळी ८.००  वाजता प्रभात फेरी काढण्यात आली
 यावेळी विद्यार्थ्यांनी मतदान करा, मत ताकद आहे’, ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ आपल्या मताचे दान आहे लोकशाहीची शान, भ्रष्टाचाराला घालूया योग्य उमेदवार देऊया अशा प्रकारच्या घोषणा देत नागरिकांमध्ये मतदान जनजागृती निर्माण केली
       लोकशाहीचा जागर उपक्रमांतर्गत आज विद्यालयात आपल्या चित्रकलेतील कौशल्य अंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे मतदान घोषवाक्य फलक तयार केले आपल्या आई वडील नातेवाईक त्याच प्रमाणे शेजारी या सर्वांमध्ये मतदान करण्याबद्दल जाणीव जागृती निर्माण व्हावी व लोकशाही बळकट करावी या विचारांची मांडणी करणारी अनेक चित्र काढून समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी याविषयीचे विचार मांडले
यासाठी सर्व शिक्षकवृंद यांची मार्गदर्शन लाभले तसेच प्राथमिक   शाळेचे मुख्याध्यापक, विद्यालयाचे प्राचार्य यांचे सहकार्य मिळाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!