गरुड झेप प्रतिष्ठान च्या वाहतूक सुरक्षा अभियानाचे सहा वर्ष पूर्ण

नाशिक / लोकवेध live न्यूज / निलेश शेकोकार 

गरुड झेप प्रतिष्ठान विविध सामाजिक उपक्रम करत नासिक मध्ये एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे. गडकोट संवर्धन , गोदावरी स्वच्छता अभियान , बेटी बचाव बेटी पढाव अभियान व वाहतूक सुरक्षा व पर्यावरण रक्षा अभियान गेली 2192 दिवस सातत्यपूर्ण राबवत नवीन जागतिक विक्रम केला आहे.
25 मार्च 2018 पासून सातत्यपूर्ण हे अभियान सुरू आहे .याचे 15 जागतिक विक्रम झाले आहेत .ब्राहो इंटरनॅशनल , वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स ,लंडन यामध्ये नोंद झाली आहे .
आज नाशिक मध्ये हेल्मेट चा वापर अनेक पटीने वाढला आहे . समाज वाहतूक सुरक्षा नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करत आहे .नाशिक अपघात शून्य करायचे असेल तर मोठ्या प्रमाणात जनजागर आवश्यक आहे. गेली 2192 दिवस गरुड झेप चे कार्यकर्ते – डॉ संदीप भानोसे ,संकेत भानोसे ,संगीता भानोसे ,रेणू भानोसे , सागर बोडके ,अंजना प्रधान , अजिंक्य तरटे ,रवींद्र जोशी, मनोहर जोशी ,रवींद्र कुलकर्णी ,सौ कुलकर्णी ,अमोल अहिरे ,राम अहिरे , प्रसाद देशपांडे ,बाबा कुलकर्णी , दिपाली सागर बोडके , सुनील भट ,अश्विनी भट ,ओमप्रकाश शर्मा ,जयश्रीताई पुणतांबेकर, सुनील परदेशी व कशिश इनामदार
तसेच
हिरवांकुर फाउंडेशन चे-
निलय बाबू शहा ,नलिनी शहा , रूपाली शहा , वेलीना ,योगेश वारे , रवींद्र पाटील व नीलिमा पाटील
व इतर कार्यकर्ते अभियान यशस्वीरित्या राबवत आहेत . सातत्यपूर्ण 2192 दिवस एखाद्या अभियान राबवणे यासाठी चिकाटी , सकारात्मक विचार, संयम ध्येयनिश्चिती कार्य प्रेरणा व राष्ट्रभक्ती तसेच समाजाप्रती अतिउप्रेम आवश्यक आहेत.
पुढील टार्गेट सातत्यपूर्ण तीन हजार दिवस असे गरुड झेप चे अध्यक्ष संदीप भानोसे यांनी जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!