त्या मृत व्यक्तीचा अंतिम प्रवासही चांगला व्हावा.- सकाळ व्यायाम ग्रुप 
सकाळ व्यायाम ग्रुपने स्मशानभूमीत साफसफाई करून दिला स्वच्छतेचा संदेश 
स्वच्छता अभियान हा एक व्यायामच आहे व्यायामा बरोबर स्वच्छता
पिंपरणे / लोकवेध live न्यूज 
 जन्म मरण अटळ आहे असं म्हणतात जन्म हाच मृत्यूचा आरंभ आहे एकदा का माणसाचा मृत्यू झाला तर त्याला अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत नेले जाते त्या मृत व्यक्तीचा अंतिम प्रवासही चांगला व्हावा या दृष्टीने सकाळ व्यायाम ग्रुपने  स्मशानभूमीत  स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील सतत सामाजिक आणि विकास कामात अग्रेसर असलेला  सकाळ व्यायाम ग्रुप च्या तरुणांनी स्मशान भूमीतील साफ सफाई करून स्वच्छतेचा संदेश देण्याचे अनोखे काम केले .या वेळी स्मशान भूमीतील अस्ताव्यस्त पडलेले प्रेतांचे पुष्पहार,शाली,कापड लाकडं झाडांची पडलेली पाने आदी वस्तूंची सफाई करण्यात आली.तसेच स्मशानभूमी नदीच्या कडेला असल्याने दारू पिणारे दारू पितात व  जागेवर बाटल्या टाकून फोडतात.त्या मुळे काही वेळेला अंत्यविधी साठी येणाऱ्या लोकांच्या पायात काच भरल्या जातात.याची खबरदारी घेत गावातील सकाळ व्यायाम ग्रुप  च्या सदस्यांनी सगळी स्मशानभूमी स्वच्छ करून एक आदर्श निर्माण केला आहे. तसेच स्मशान भूमी झाडून कचऱ्याचे विल्हेवाट लावण्यात आली. सर्व स्मशान भूमी स्वच्छ करण्यात आली.यावेळी सदर सफाई अभियानास सकाळ व्यायाम ग्रुप  च्या तरुणांनी सहभाग घेतला असून कचऱ्याचे व्यवस्थापन कश्या प्रकारे केले जावे त्याचे नामफलक गरजेच्या ठिकानी लावण्यात आले आहे.तसेच गावात . या उपक्रमाचे पिंपरणे ग्रामस्थांनी कौतुक केल.
सकाळ व्यायाम ग्रुप समाजहिताच्या कामाला प्राधान्य देऊन
 साफ-सफाई अभियान, लोकहीतासाठी कामे, गावातील सामाजिक कार्यक्रमात सहभाग, वृक्षारोपण व गावात लोकहिताच्या कामावर भर दिला जाईल असे  सकाळ व्यायाम ग्रुप यांनी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!