आधारच्या मदतीने जळीतग्रस्त ऊसतोडणी कुटुंबीय सुखावले…
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
समनापूर येथे राहत असलेल्या  नाना निकम,भरत निकम,दगडू पगारे या ऊसतोडणी कामगारांच्या तीन झोपड्या मंगळवारी सकाळी अकरा वाजता लागलेल्या  आगीत भस्मसात झाल्या. चाळीसगाव येथून हे कामगार आलेले आहेत.एका कामगाराने नुकताच बैल विकला होता.आलेले २५ हजार रुपये झोपडीतच होते.तेही जळून खाक झाले.या घटनेची माहिती  पत्रकार बाबासाहेब जाधव यांचेमार्फत आधारचे समन्वयक सोमनाथ मदने यांना मिळताच  आधार ग्रुपवर मदतीचे आवाहन केले.या आवाहनाला प्रतिसाद देत आधारचे समन्वयक तान्हाजी आंधळे, आधारचे शिलेदार उद्योजक पवन राजपाल,उद्योजक श्रीकृष्ण कोळपकर,संतोष भुजबळ,डॉ.संतोष पोखरकर, प्राचार्य मच्छिन्द्र दिघे,बाळासाहेब आहेर,रामदास सोनवणे,नाना जगताप,पंडित गुंजाळ,संजय एरंडे आदींनी तात्काळ मदत पाठवत
तीनही जळीतग्रस्त कुटुंबियांना सर्व संसारोपयोगी साहित्य महिनाभराचा किराणा,धान्याचे कट्टे,साड्या,अंथरुण-पांघरुण साहित्य उपलब्ध करण्यात आले.
.   ही मदत घेऊन आधार परिवार धावत जाऊन सर्व तीनही कुटुंबियांची सायंकाळची चूल पेटली.या मदतीने तीनही कुटुंबियांचे डोळे पाणावले.दुःखद प्रसंगीही आपल्या सोबत कुणीतरी असल्याचा सुखद भाव त्यांच्या चेहऱ्यावर  दिसून आला.याप्रसंगी आधारचे शिलेदार सेवानिवृत्त विस्तार अधिकारी डी.डी.वाकचौरे,डॉ.संतोष पोखरकर,सुखदेव गाडेकर,रोहिदास गाडेकर,एकनाथ साबळे,आर.जी.पावसे,सखाराम पाटील,राजेंद्र सूर्यवंशी,तान्हाजी आंधळे,इरफान इनामदार आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी आधारच्या कार्याचे कौतुक करत आधार टीमचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!