देशमुख विद्यालयातील दोन महीला कुस्ती मल्लांची महीला महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड.

राजूर / लोकवेध live न्यूज 

दिनांक ६ ते ७ एप्रिल २०२४
रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती ( महीला महाराष्ट्र केसरी) स्पर्धेत राजूर येथील ॲड . एम . एन. देशमुख महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. शिंदे दामिनी दिगंबर ( प्रथम वर्ष कला ) ६५ किलो वजन गटात निवड, व सोनवणे दीक्षा शंकर ( १२ वी कॉमर्स ) ५९ किलो वजन गटात निवड झाली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ, बी. वाय. देशमुख यांनी दिली आहे.
दामिनी व दीक्षा या भारतीय खेळ प्राधिकरण नव्वी दिल्ली यांनी दत्तक घेतलेल्या ॲड. एम . एन. देशमुख महाविद्यालय साई कुस्ती सेंटर मध्ये कुस्ती प्रशिक्षण घेत आहेत . त्यांना विद्यालयातील शारिरीक शिक्षक विभाग प्रमुख प्रा. विकास नवले , व कुस्ती केंद्राचे कोच आंतरराष्ट्रीय पदक विजेते तानाजी नरके यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
त्यांच्या या यशाबद्दल सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड.मनोहरराव देशमुख, सचिव टी. एन. कानवडे, कोषाध्यक्ष विवेकजी मदन, संचालक मिलिंदशेठ उमराणी व संस्था पदाधिकारी, प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी नागरिक यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!