शिक्षक हे विद्य्यार्थांना संस्कारक्षम आणि कार्यक्षम बनविण्याचे कार्य करतात- कवी अनिल देशपांडे

पोखरी हवेली येथे इयत्ता सातवीच्या विदयार्थ्यांचा निरोप समारंभ

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थांचा शैक्षणिक पाया भक्कम होतो.यावरच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेतांना विद्यार्थ्यांची शैक्षणिक इमारत भक्कम उभी राहाते.शिक्षक हे विद्य्यार्थांना संस्कारक्षम नि कार्यक्षम बनविण्याचे कार्य करतात असे प्रतिपादन प्रमुख अतिथी लेखक व कवी अनिल देशपांडे यांनी केले.जि.प.प्राथ.शाळा पोखरी हवेली येथे इयत्ता सातवीच्या विदयार्थ्यांच्या निरोप समारंभात ते बोलत होते.याप्रसंगी केंद्रप्रमुख आशा घुले,ग्रामपंचायतचे सरपंच सुदाम खैरे,उपसरपंच सोमनाथ थिटमे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन आगळे,सदस्या सुनिता घुले आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना देशपांडे म्हणाले,इयत्ता सातवीच्या विद्यार्थांच्या निरोप समारंभ हा भावूक असला तरी पहिलीपासून सातवीपर्यंत शाळेचे शिक्षक व शिक्षिकांनी तुम्हाला छान घडवले यांचा आनंद साजरा करा.देशपांडे यांनी कविता, जादू,बैठे खेळ आणि काही हलक्या-फुलक्या विनोदातून विद्यार्थांना प्रबोधन केले.
याप्रसंगी मिशन-आरंभ व मंथन परीक्षेतील सर्व पात्र विदयार्थ्यांना कंपास पेटी बक्षीस देण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी विदयार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.सातवीच्या सर्व मुलांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी एक दर्जेदार पंखा भेट दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एकनाथ साबळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी पदवीधर शिक्षक आर.जी.पावसे,सुरेश साळुंके,दस्तगीर शेख,सखाराम पाटील,राजेंद्र सूर्यवंशी,सोमनाथ मदने यांनी विशेष परिश्रम घेतले.आभार प्रदर्शन शकुंतला शेळके यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!