निमगाव जाळी ग्रामपंचायत उपसरपंचपदी सुरेश डेंगळेयांची निवड

निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी 

निमगाव जाळी ता.संगमनेर येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक आज रोजी दुपारी ग्रामपंचायत कार्यालय निमगाव जाळी येथे संपन्न झाली. यावेळी निमगाव जाळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुरेश दगडू डेंगळे यांची एकमताने निवड करण्यात आली. या सभेसाठी सरपंच प्रतिभा जोंधळे,उपसरपंच ज्ञानेश्वर डेंगळे ग्रामविकास अधिकारी मिसाळ वाय.एम,सदस्य साक्षी जोंधळे,बाबासाहेब डेंगळे,भास्कर खरात,वैभव वदक,सीमा तळोले,संगीता तळोले,दिलीप डेंगळे,कमल थेटे,पुष्पा डेंगळे,मंदा अरगडे,उषा पवार हे सदस्य उपस्थित होते. या निवडीप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी सचिव शिवाजीराव जोंधळे साहेब ,प्रवरा बँकेचे व्हा.चेअरमन मच्छिंद्र पा.थेटे,प्रा.दीपक डेंगळे, दिलीप डेंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.उपसरपंचपदी सुरेश डेंगळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा,सौ शालिनीताई विखे पा.,खा.सुजयदादा विखे पा.,महाराष्ट्र राज्याचे माजी सचिव शिवाजीराव जोंधळे साहेब व निमगाव जाळी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!