
उत्कर्ष रूपवते यांच्या उमेदवारी ची जनतेतून मागणी
संगमनेर / लोकवेध live न्यूज
गावागावातून घुमू लागला स्वाभिमानाचा नारा नको वाकचौरे, नको लोखंडे आता फक्त आमची उत्कर्षा रुपावते…. शिर्डी लोकसभा उमेदवार मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने या मतदारसंघात यावेळेस तरी दलित बौद्ध समाजाला उमेदवारी मिळेल अशी भावना अनेक समाज बांधवांची होती . मात्र सर्वच पक्षांनी यंदाच्या निवडणुकीतही दलित बौद्ध बांधवांना नाकारल्याने संपूर्ण शिर्डी लोकसभा मतदारसंघात संतापाची तीव्र लाट निर्माण झाली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील दलित बांधवांनी या निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचाराकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. वाकचौरे नको आणि लोखंडे पण नको अशा भूमिकेत दलित बांधव आले असून आता फक्त उत्कर्ष रूपवते निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी मतदारसंघातून केली जात आहे. उत्कर्षा रुपवते या काँग्रेसच्या युवा नेत्या आहेत त्यांना राजकीय सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी आहे . महिला आयोगाच्या त्या सदस्य ही आहे आपल्या कामातून त्यांनी संपूर्ण राज्यात वेगळी छाप निर्माण केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षांकडून त्यांना उमेदवारी दिली जाईल अशी खात्री अनेकांना होती मात्र शिर्डीची लोकसभा ची जागा आपल्या कोट्यात घेण्यासाठी काँग्रेसचे नेते असमर्थ ठरले . यामुळे उत्कर्ष रुपवते यांना संधी मिळालेली नाही. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी उत्कर्षा रूपवते इच्छुक आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी वंचित आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांची मुंबई येथे भेट घेतली. यानंतर रुपवते त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली. शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये बौद्ध दलित मुस्लिम मराठा मतदारांची संख्या लक्षणीय आहे. रुपवते यांनी निवडणूक लढवल्यास त्यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळणार आहे. मतदार संघातील अनेक मतदार विद्यमान उमेदवारांवर प्रचंड नाराज असल्याचे दिसत आहे आता फक्त उत्कर्षा रुपवते याच आमच्या उमेदवार असतील अशी भावना संपूर्ण शिर्डी लोकसभा मतदार संघात निर्माण झाले आहे. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे गेली दहा वर्ष शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्यांनी दहा वर्षात बौद्ध समाजासाठी काय केले असा संतप्त सवाल बौद्ध समाज विचारत आहे या निवडणुकीतील उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी खासदार झाल्यानंतर दुसऱ्या निवडणुकीत शिवसेनेला सोड चिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी वाकचौरे यांना पुन्हा शिवसेनेच्या दारात उभे करणार नाही असा इशारा दिला होता. असे असतानाही ठाकरे यांनी पुन्हा भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी वाकचौरे यांना दारात उभे केले असते तरी आम्ही आमच्या दारात त्यांना उभे करणार नाही म्हणजे त्यांना मतदान देणार नाही असा इशारा गावातील कार्यकर्ते देत आहे.
