खा. डॉ सुजय विखे पाटील यांना धमकी देणार्या व्यक्तिवर व त्याला पाठबळ देणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी –  भाजपा संगमनेर 
 संगमनेर तालुका भाजपाच्या वतीने प्रांताधिकारी, डी वाय एस पी यांना निवेदन 
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. डॉ सुजय विखे पाटील यांना धमकी देणार्या व्यक्ति विरोधात तसेच कोण आहे याचा शोध घेऊन त्यांच्यावरही कायदेशीर  कारवाई कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन संगमनेर तालुका भाजपा  च्या वतीने प्रांताधिकारी  शैलेश शिंगे आणि डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना देण्यात आले
 या निवेदन त्यांनी असे म्हटले आहे की
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची प्रक्रीया सुरू झाली असून महायुतीच्या वतीने खा. डॉ सुजय विखे पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मतदारांच्या गाठीभेटी त्याांनी सुरू केल्या असून सर्व मतदार संघातून त्याांना भरघोस पाठींबा मिळत आहे. मात्र जनाधार मिळत नसल्याच्या कारणाने महाविकास आघाडी मध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली असून महायुतीचे उमेदवार खा. डॉ सुजय विखे यांना समर्थन देणार्या किंवा त्याांच्या बाजूने बोलणार्या नागरीकांना धमकावण्याचे प्रकार विरोधी उमेदवार आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून सुरू झाले आहेत. आशाच धमकीच्या एका घटनेत विरोधी उमेदवाराच्या समर्थकांनी महायुतीचे उमेदवार खा.डॉ सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालण्याची भाषा वापरून एकप्रकारे त्याांना धमकावण्याचा प्रयत केला आहे. सदर संभाषणाची ध्वनिफीत समाज माध्यात प्रसारीत झाल्याने आमचे उमेदवार खा. डॉ सुजय विखे पाटील यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून समाज माध्यमात प्रसारीत झालेल्या ध्वनिफीती मधील संवादातून धमकी देण्यार्याची नावही समोर आली आहेत. तसेच ज्यांच्या समोर धमकी देण्याचा प्रकार घडला त्या सर्वाची चौकशी होवून त्याांच्यावर कारवाई करावी तसेच महायुतीचे उमेदवार खा डॉ सुजय विखे पाटील यांना संरक्षण द्यावे आशी महायुती मधील सर्व घटक पक्षाची मागणी आहे.  धोका लक्षात घेवून, धमकी देणार्या सर्व संबंधित व्यक्ति तसेच त्याांना पाठबळ देणार्या व्यक्ति विरोधात तातडीने कारवाई करावी. त्यााचे कॉल रेकॉर्ड, सीडीआर तसेच संबिधित व्यक्तिची समाजिक राजकीय पार्श्वभूमी तपासून यामध्ये अन्य कोणी व्यक्तिचा सहभाग आहे का याचाही तपास करावा आशी मागणी या निवेदनाद्वारे आम्ही करीत आहोत. घटनेचे गांभीर्य न घेतल्यास महायुतीच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करून निषेध करू असे म्हटले आहे यावेळी  खासदार सदाशिव लोखंडे भाजपा तालुका अध्यक्ष वैभव लांडगे संजय गांधी योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ दादा गुंजाळ अशोक कानवडे मालुंजे सरपंच संदीप घुगे कोल्हेवाडी सरपंच राहुल दिघे दीपक  भगत प्रसाद वर्पे दुर्गेश देशमुख आधीसह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!