पत्रकार परिषदेतून सडेतोड बोलणारे काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिंदेंच्या सेनेत दाखल !

शिर्डी  / लोकवेध live न्यूज 

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून काँग्रेसला दिल्लीपासून गल्लीपर्यंत हादरे बसत आहेत. अनेक बडे नेते काँग्रेसची साथ सोडत असताना आज गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. प्रसारमाध्यमांसमोर काँग्रेसची भूमिका रोखठोकपणे मांडणारे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर पक्षाची साथ सोडत त्यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत शिंदेची साथ धरली .

शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू वाघमारे म्हणाले की, काँग्रेस पक्षाची सध्याची स्थिती आणि काँग्रेस पक्षाची सध्या होत असलेली फरफट, एका राष्ट्रीय पक्षाची एका प्रादेशिक पक्षाने केलेली ससेहोलपट पाहता आणि काँग्रेस पक्षामधील काही नेत्यांच्या स्वार्थी आणि गलिच्छ राजकारणामुळे व्यथित होऊन मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे

ते पुढे म्हणाले की,ज्या पद्धतीने काँग्रेस पक्ष काम करतोय, तसेच कुणाचाच कुणामध्ये नसलेला मेळ , महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या हाताखाली दबलेला काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष काम करतोय का अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे , मुंबई उत्तर पश्चिमची जागा संजय निरुपम यांनी मागितली तेव्हा ती जागा मागू नये यासाठी त्यांच्यावर पक्षांतर्गत दबाव आणला गेला. त्यांना शेवटी पक्षातून बाहेर काढण्यात आलं. आज सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना टाचा घासाव्या लागत आहेत. ती जागा आपली असल्याचं रक्त आटवून सांगावं लागतंय, मात्र ठाकरे सेने तिथे उमेदवार जाहीर करून टाकला आहे. तसेच शिर्डी हे अंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून येथे ही कॉग्रेसल विश्वासात न घेता ठाकरे गटाने उमेदवार घोषित केल यातून काँग्रेसची राज्यातील परिस्थिती काय आहे, हे दिसतंय, असा टोला राजू वाघमारे यांनी लगावला आहे.

 

हीच परिस्थिती भिवंडी येथे आहे. तिथे शरद पवार यांनी आपल्या पक्षाचा उमेदवार जाहीर करून टाकला आहे. काँग्रेसची किंमत संपलेली आहे हेच यातून दिसून येत आहे. याचा परिणाम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर होणं साहजिकच आहे. हा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात झाला आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसजन दु:खी आहेत, व्यथित आहेत. पुढे भवितव्य काय आहे हे त्यांना कळत नाही आहे. त्यांना ते भविष्य दाखवण्यासाठी आज गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मी शिवसेनेत प्रवेश केला आहे, असे राजू वाघमारे यांनी सांगितले.

 

दोन दिवसापुर्वी बबनराव घोलप यांनी महसूलमंत्री विखे पाटील यांची संगमनेर येथे भेट घेवून शिंदे शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर गुढी पाडवाच्या मुर्हुतावर कॉग्रेस पक्षाचा आवाज समजले जाणारे डॉ राजू वाघमारे यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश करुन भूंकप घडविल्याने शिर्डीतून लोखंडेना आता बबन घोलप , डॉ राजू वाघमारे , नचिकेत खरात हे तीन पर्यायी स्पर्धक निर्माण झाल्याने आता कोण ही चर्चा चालू झाली .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!