अखेर वंचित चे संचित, रूपवतेच्या नावावर ! उत्कर्षाचा तिकिटानेच होणार उत्कर्ष
संगमनेर / लोकवेध live न्यूज / भारत रेघाटे
शिर्डी मतदार संघात असतील एक दोन अथवा तीन चार तगडे. त्यांचे काही असो गडे, शेवटी तिकीट आपल्याच पदरात पडे ! अन् उत्कर्षांनेच भरवले एड प्रकाश आंबेडकरांनाच पेढे ! अखेर वंचित चे संचित रूपवतेच्या नावावर! उत्कर्षाचा तिकिटानेच होणार उत्कर्ष. खासदारांची माळ यावर्षी उत्कर्षा रूपवते यांच्या नावावर. लोकवेधने साधला आपला वेध. खरे ठरवले इतिवृत्त ! गेल्या काही दिवसापासून उत्कर्षा रूपवते यांना वंचित बहुजन आघाडीचे तिकीट मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ती आता एका राजी करत जाहीरनाम्यातून सत्यात उतरली. असे म्हणतात ना एका रात्रीत काही होऊ शकते. हे विधान आजच्या रात्रीत खरे ठरले. माणसाने आशावादी असावे हे व्यक्त करतानाचे भाव उत्कर्षाच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होते. तो क्षण, त्याचक्षणी खूप काही सांगून गेला. औचित्य होते डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे. ही भूमी विचारांची आणि चळवळीची आहे. येणारा काळ परिवर्तनाचा असेल
येणारा काळच उत्कर्षाचा असेल ! उत्कर्षा रूपवतें चे हे वाक्य खूप काही सांगून गेले.
