ॲड.  प्रकाश आंबेडकरांकडून विचाराधीन ? तर उत्कर्षां रूपवते यांना आहे आशावाद; वंचिताचे तिकीट मिळण्याचे 90 टक्के खात्रिलायक वृत्त

संगमनेर / लोकवेध live न्यूज भारत रेघाटे

शिर्डी मतदारसंघात शिवसेना गटाचे दोन्ही तगडे उमेदवार निश्चित झाले असून गेल्या काही दिवसापासून उत्कर्षा रूपवते यांना वंचित बहुजन आघाडीचे तिकीट मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष एड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून अद्याप मनापासून कोणताच निर्णय झालेला दिसून येत नाही. केवळ त्यांच्या या विलंबाने उत्कर्षा रूपवते यांचा नंबर हा एकूणच वेटिंगवर असल्याचे जाणवत आहे . काँग्रेस पक्षाच्या युवा नेत्या व राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते यांनी आपला राजीनामा देऊन एक प्रकारे मोठा धक्काच दिला आहे.
उत्कर्षा रूपवते यांचा राजीनामा हा वंचित बहुजन आघाडीला तिकीट देण्यास भाग पाडेल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. उत्कर्षा रूपवते यांना वंचित बहुजन आघाडीने तिकीट दिल्यास भाऊसाहेब वाकचौरे आणि सदाशिव लोखंडे यांनाही त्या भारी पडू शकतील. कारण मताची आकडेवारी बघता तसेच या दोन्ही उमेदवारावर विकास कामाच्या माध्यमातून व भेटीगाठीच्या माध्यमातून मतदार संघात असलेली नाराजी पुढे येऊ पाहत आहे. दोन्ही उमेदवाराकडून मतदार संघात ज्या गोष्टीची वेगाने हालचाल होणे अपेक्षित होते , तसे होत नसल्याची एकप्रकारे कुर्मगती दिसून येत आहे. दरम्यान एका कार्यक्रमात उत्कर्षा रूपवते यांना तिकीटा बाबत विचारणा केली असता त्यांनी होईल हा शब्द फेक केला. त्यांचा हा आशावाद व्यक्त करतानाचे भाव त्यांच्याच चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होते. परंतु एड. प्रकाश आंबेडकरांकडून उत्कर्षा रूपवते यांचे नाव विचाराधीन असल्याचे नव्हे तर आता 90 % स्पष्ट होत आहे. केवळ निर्णय घेण्यास होणारा विलंब हा अनुमान तर्कातीत आहे. उत्कर्षा
रूपवते यांचा राजीनामा हा वंचित बहुजन आघाडीला तिकीट देण्यास कारणीभूत ठरू शकतो. उत्कर्षा रूपवते ह्यांना तिकीट मिळाल्यास शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या त्या विजेता उमेदवार ठरण्याची शक्यताही नाकारता येणाल नाही. खरे तर उत्कर्षा रूपवते ह्या उभ्या राहिल्यास भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतावर परिणाम होण्याची शक्यता आहे हेही तितकेच खरे. किंबहू विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे यांना पुसटसा फायदाही होईल असा कयास बांधणे शक्य आहे. वंचित बहुजन आघाडी हा स्वतंत्र विचारांचा एक पक्ष व स्वतःच वेगळं अस्तित्व असलेला पक्ष आहे. निश्चितच अभ्यासू आणि भारदार व्यक्तिमत्वाची छाप पाडणारी एक महिला उमेदवार म्हणून आजच्या परिस्थितीतून उत्कर्षा रूपवते यांचेकडे मतदारांचा कौल राहील हे निश्चित. शिर्डी हा महाराष्ट्रातील 48 वा लोकसभा मतदार संघापैकी एक आहे. नगर जिल्ह्यातील उत्तर विभागात सात विधानसभा मतदारसंघ संघाशी जोडलेला आहे. एस. सी अनुसूचित जाती उमेदवारासाठी हा मतदारसंघ राखीव आहे. आणि शेवटची संधी आहे. अहमदनगर जिल्ह्यात दोन लोकसभा मतदार संघ असून होऊ घातलेल्या येत्या 18 व्या शिर्डी लोकसभा मतदार संघांमध्ये उत्तर विभागामध्ये नेवासा, श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर , राहाता आणि अकोले तालुका साडेतीन लाख बौध्द, इतर वर्गाच्या तुलनेत अन्य समाजाचे मताधिक्य व बहुसंख्य ओबीसी ओपन एन टी आदिं समाजाचा समावेश यामध्ये होतो. गेली काही वर्ष खासदार सदाशिवराव लोखंडे आणि भाऊसाहेब वाकचौरे यांनी या मतदारसंघावर आपले आधीराज्य गाजवले असले तरी भविष्याचा काळ हा त्यांच्यासाठी आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. त्यातच उत्कर्षा रूपवते यांना वंचित बहुजन आघाडीने तिकीट दिल्यास एक होतकरू अभ्यासू महिला किंवा प्रभावी नेतृत्व म्हणून उत्कर्षा रूपवते ह्याच आघाडीवर राहून विजय संपादन करू शकतील.
या मतदार संघांमध्ये आतापर्यंत कोणत्याच पक्षाकडून बौद्ध समाजाला तिकीट दिल्या गेल्याचे दिसून येत नाही. परंतु या मतदार संघांमध्ये बहुसंख्येने बौद्ध समाज असल्याने मात्र यावेळेस वंचित बहुजन आघाडी नक्कीच उत्कर्षा रूपवते यांना टिकीट दिल्यास 90% बौद्ध समाजाचे मतदान उत्कर्षा रुपवते यांना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही बाकीचे 50% मतदान त्यांच्या कार्यातून मिळण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षात मतदार संघात बांधणी करण्याचं काम त्यांनी केल्याचे विसरता कामा नये. तसेच बहुजन शिक्षण संघाच्या माध्यमातून सात तालुक्यातील खूप मोठे काम उभे केले. सत्तेचा परिणाम महिला आयोगावर झाल्याने उत्कर्षा रूपवते महिला आयोगावर असतानाही त्यांच्या कार्याचा लेखाजोखा पुढे गेल्याचे दिसून येते. माजी मंत्री दादासाहेब रूपवते, एड. प्रेमानंद रूपवते आणि उत्कर्षा रूपवते ही तिसरी पिढी राजकारणाशी निगडित आहे. 35 ते 38 वयोगटातील एम एस डब्ल्यू झालेली या युवतीचे प्रभावशाली प्रभुत्व हिंदी, इंग्रजी, मराठी या तिन्ही भाषांवर असून मुंबईमध्ये तिचे शिक्षण झालेले आहे. आमदार शिरीष चौधरी यांचेही भरभक्कप योगदान त्यांना लाभून भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे ते हमखास म्हणतील !
यात शंका नसावी. खासदार सदाशिव लोखंडे यांना पाच लाख 33 हजार मतदान मिळाले होते ,तर माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांना तीन लाख 33 हजार असे मतदान मिळाल्याचे आपण पाहिले. परंतु यावेळी दोघांच्या भांडणांमध्ये तिसऱ्याचा लाभ होणार का ? हे येणारा काळच ठरवेल ! मग ते तिकिट असो अथवा विजय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!