श्रीक्षेत्र निमज ते श्रीक्षेत्र पैठण दिंडीचे पिंपरणेत जोरदार स्वागत
गावातील वातावरण भक्तीमय झाले होते
पिंपरणे : लोकवेध live न्यूज
श्री क्षेत्र निमज ते श्रीक्षेत्र पैठण पायीदिंडी सोहळ्याचे पिंपरणे गावात आगमन झाले गावात दिंडीचे आगमन होताच फटाके वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले माऊलीच्या नामाने आणि पांडूरंगाच्या भजन करत गावातील भाविकही मोठयाप्रमाणावर सहभागी झाले

त्यामूळे गावातील वातावरण भक्तीमय झाले होते.सालाबाद प्रमाणे हभप निवृत्ती महाराज मतकर व रामनाथ महाराज शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र निमज येथून पायी दिंडी सोहळयाचे प्रस्थान झाले दिंडी बरोबर अरोग्य सेवा भोजन व्यवस्था, पानी, ह्या सर्व सुविधा बरोबर घेऊन अतिषय शिस्तबध्द मार्गस्थ झाली

पिंपरणे येथे सायंकाळी दिंडीचे आगमन झाले दिंडीचे स्वागत गावातील उत्तमनाना राहिंज, पत्रकार सुभाष भालेराव, संतोष देशमुख, पो.पा.विनोद साळवे ,संतोष वाकचौरे, गोकुळ काळे, सुरेश गाडेकर. भाऊराव आ. ठोंबरे. सुधाकर कर्पे यांच्या शुभाहस्ते पुजन करून करण्यात आले .यावेळी ग्रामस्थ मोठयाप्रमाणावर उपस्थित होते

त्यानंतर दिंडीच्या वतिने सामूहिक हरिपाठ घेण्यात आला तदनंतर प्रवचन होऊन होळी सण असल्यामुळे सणानिमित्त दिंडीला पुरणपोळी जेवण करण्यात आले होळी सण असल्या कारणाने पुरणपोळी जेवणाचे अन्नदान काकासाहेब गायकवाड, उपसरपंच अजित देशमुख, संतोष वाकचौरे, संजय बागुल, कल्याण जोर्वेकर, मंजाबापू साळवे, पोलीस पाटील विनोद साळवे, भागवत ठोंबरे, दीपक अभंग, गोकुळ काळे, उत्तम राहिंज, पत्रकार सुभाष भालेराव , भाऊराव आ. ठोंबरे या ग्रुपच्या वतीने देण्यात आले गेली ७ वर्ष पासून हा ग्रुप ही सेवा अखंडीत पणे करत असून सुरू केलेली ही सेवा आज सुद्धा अखंडपणे अत्यंत प्रामाणिक पणे पार पाडत आहेत यावेळी गावातील तरूण किशोर जोर्वेकर, राजेंद्र देशमुख रवींद्र ठोंबरे ,धामणे पाहूणे सुभाष कर्पे, विलास काळे,राजेंद्र काळे सुनील दिवेकर यांनी वारकऱ्याच्या सेवेत मदत केली
