महंत दत्तगिरी महाराज यांच्या भव्य  मिरवणुकीने आणि ज्ञानेश्वरी पारायणाने ब्रह्मलीन माणिक गिरी महाराज व बिरोबा महाराज सप्ताहास  प्रारंभ
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
    संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र वरवंडी येथे रविवार दिनांक १७ सुरू होणाऱ्या ब्रह्मलीन माणिक गिरी महाराज व बिरोबा महाराज सप्ताहास महंत दत्तगिरी महाराज यांच्या भव्य   मिरवणुकीने आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व होम हवनाने हरिनामाच्या गजरात व भक्तमय वातावरणात प्रारंभ झाला
     श्रीक्षेत्र वरवंडी  येथे १७ डिसेंबर ते २४ डिसेंबर या कालावधी ब्रह्मलीन माणिक गिरी महाराज व बिरोबा महाराज सप्ताह पार पडणार आहे गावातील माणिकगिरी महाराजांच्या समाधीस्थळापासून सनई ढोलीबाजा या पारंपरिक वाद्यावर नाचत गात  मिरवणुकीस प्रारंभ झाला
महिला बाल गोपाळ, भाविक, कलश व तुळसधारी महिला डोक्यावरती तुळस आणि कलश घेऊन या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या
मिरवणूक गावात आली त्यावेळी अनेक महिलांनी आणि पुरुषांनी फुगड्या खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला
संपूर्ण गावातून निघालेल्या मिरवणुक मार्गावर ठिकठिकाणी सडा रांगोळी काढण्यात आली होती प्रवरा माध्यमिक मुलींच्या लेझीम पथकाने मिरवणुकीत रंगत आणली
तर् जिल्हा परिषद शाळेच्या मुलांनी विविध देवतांची वेशभूषा केली होती ही वेशभूषा मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले  या मिरवणुकीत लहान बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत तरुणींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत अबाल वृद्ध सर्वच मिरवणुकीत माणिकगिरी महाराज बिरोबा महाराज,दत्तगिरी महाराजांचा जयजयकार करत होते या मिरवणुकीत सजवलेल्या घोडेगाडी रथामध्ये महंत दत्तगिरी महाराज विराजमान झाले होते
 मिरवणूक  गावात आली असता दत्तगिरी महाराजांनी ग्रामदैवत गणपती,हनुमान, विठ्ठल रुक्माई, आणि ग्रामदैवत बिरोबा महाराज  यांचे आशीर्वाद घेतले.मिरवणूक गावात आली  असता  महंत दत्तगिरी महाराज महाराजांवर व मिरवणुकीतील भाविकांवर ठिकठिकाणी जेसीबी वरून फुलांची उधळण ग्रामस्थांनी केली
मिरवणूक सप्ताहस्थळी आली असता यावेळी दत्तगिरी महाराजांनी पंचपदी म्हणत २४ तास चालणारा भजन प्रहारा सुरू केला त्यानंतर होम पेटवण्यात आला त्या ठिकाणी गावातील तरुण जोडपे होमासाठी बसले.
त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात केली सर्व धार्मिकविधी पार पडल्या नंतर महाराजांच्या आज्ञेनुसार महाप्रसादास सुरुवात झाली वरवंडी कुंभारवाडी चौधरवाडी ग्रामस्थांनी सर्व भाविकांना पुरणपोळी चा महाप्रसाद भाविकांना दिला पहिल्या दिवशी जवळपास ५००० भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला
 भाविकांनी सप्ताहाचा आनंद घ्यावा – महंत दत्तगिरी महाराज 
        ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज अखंड फिरता नारळी सप्ताहाचे हे पंधरावे वर्ष असून वरवंडीकरांनी या सप्ताहाचे आयोजन अतिशय नियोजनबद्ध आणि सुंदर  केले आहे या ठिकाणी रोज विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून रात्री सात ते नऊ नामवंत कीर्तनकारांची कीर्तन होणार आहे  भाविकांना सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत महाप्रसाद मिळणार आहे तरी  या सप्ताहास येऊन  भाविकांनी महाप्रसादा बरोबर ज्ञानाची शिदोरी घेऊन जावी असे आवाहन महंत दत्तगिरी महाराज यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!