विरोधकांना पराभव दिसू लागल्याने त्यांचा संयम सुटत आहे – उत्कर्षा ताई रुपवते
नुकत्याच उमेदवार रुपवतेंच्या गाडीच्या काचा फोडल्या व आता बॅनर फाडले या घटनेचा मतदारांमधून संताप व्यक्त करत निषेध केला जात आहे
रुपवतेच्या प्रचारातील आघाडीचा विरोधी उमेदवारांनी घेतला धसका
शिर्डी / लोकवेध live न्यूज
शिर्डी लोकसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी भिरभिरले आहेत- उत्कर्षा रूपवते. शिर्डी लोकसभेच्या निवडणुकीत विरोधक भिरभिरले आहेत असे वक्तव्य शिर्डी लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी केले आहे शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वंचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्ष रूपवते यांच्या गाडीवर काही समाजकंटकांनी हल्ला केला तर संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भागातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्ष रूपवते यांचा बॅनर फाडण्यात आला यामुळे रूपवते यांनी म्हटले आहे की प्रतिस्पर्धी उमेदवारांकडे अमाप पैसा आणि सत्ता आहे.पण जनतेचा पाठींबा नाही. माझ्याकडे फक्त जनतेचा पाठींबा आहे. माझे प्रतिस्पर्धी समोर येऊन मला थांबवू शकत नाहीत. म्हणून ते कधी रात्री माझ्या चालत्या गाडीवर दगडफेक करतात, तर कधी माझे पोस्टर फाडून टाकतात. लेकीन आपुन रुकेगा नही साला ! असा उपरोधक टोला उत्कर्षा रूपवते यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना लावला आहे

