एक दिवस मातीसाठी एक दिवस मतांसाठी :- आदित्य घाडगे
संगमनेर / लोकवेध live न्यूज / भारत रेघाटे
समाजात वावरतांना मानवाच्या संवेदना बोथट होत चालल्याचे आपणास क्षणोक्षणी दिसून येते. मग तो स्वच्छतेचा विषय असो, सहकार्याचा विषय असो , असेल कोणताही अन्य विषय परंतु आपण समाजाचे, या मायभूमीचे, मातीचे देणे लागतो हा उदात्त हेतू नजरेसमोर ठेरून प्रत्येक व्यक्तीने या मायभूमीसाठी मातीसाठी झटले पाहिजे. तिचे जतन संवर्धन करीत या वसुंधरेला सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्नशील राहिले पाहिजे. आदित्य घाडगे
हे तमाम मतदार बंधू भगिनी नवयुवकांना सांगू इच्छितात की, “एक दिवस मातीसाठी एक दिवस मतासाठी” आपण दिलाच पाहिजे. या मातीत आपण जन्माला आलो. या मातृभूमीचे आपल्यावर अनेक ऋण आहेत. या मातृभूमीची सेवा करण्याचे भाग्य काही लोकांनाच लाभते आणि तो वसा घेत एक दिवस मातीसाठी म्हणून आदित्य कधी स्मशानभूमी तर कधी प्राथमिक आरोग्य केंद्र तर कधी बस स्थानक तर कधी रस्त्यावर हा स्वच्छतादूत हमखास आपणास दिसतोस दिसतो. आपणास आज ठीकठिकाणी अस्तव्यस्त पडलेला कचरा असेल किंवा अपघातात मृत पावलेली व्यक्ती असेल कदाचित एखादे जनावर ,पशू पक्षी असतील वसुंधरेला सुजलाम सुफलाम करण्यासाठी या प्राणिमात्रांचे संरक्षण करण्याचे वंचित जिवांना पाण्यासाठी किंवा सर्व धर्मीय जातीच्या स्मशानभूमीच्या स्वच्छतेसाठी मंदिर मज्सिदतेच्या स्वच्छतेसाठी रस्त्यावरील स्वच्छतेसाठी आपण पुढाकार घेणे गरजेचे आहे. यशस्वी फाउंडेशन ही त्यासाठीच दर आठवड्यातील प्रत्येक रविवारी किंबहुना रस्त्याने जाता येता अचानक दिसणाऱ्या अनेक समस्यासाठी
अग्रक्रमाने पुढाकार घेते. त्याचे सर्वेसर्वा आदित्य घाडगे हे होत. आदित्य घाडगे म्हणजे संगमनेर शहरातील एक उगवता सूर्य. अर्थात आदित्य या शब्दाचा अर्थही सूर्य. आदित्य वार म्हणजेच रविवार. अशा दर रविवारी आदित्य घाडगे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो तद्वतच या मातीचेही आपण देणे लागतो ही वैश्विक भावना केवळ उराशी न बाळगता प्रत्यक्ष कृतीतून ती साकारण्याचे काम सातत्याने गेली पाच वर्षापासून ते करीत आहे. म्हणूनच एक दिवस मातीसाठी जरी असला तर या राष्ट्र उभारणीत एक दिवस मताचाही महत्त्वाचा ठरणार आहे. आदित्य घाडगे यांनी रविवारी खांडगाव बस शेडची स्वच्छतेसाठी आपला दिवस दिला .असे अनेक दिवस त्यांनी समाजासाठी या मातीसाठी दिलेत. काल अचानक रस्त्यात भेट झाली. गाडीवर एक बोर्ड लावला होता. तो संदेश होता मतदान करण्यासाठीचा. या राष्ट्र उभारणीत प्रत्येक व्यक्तीचे मत हे अमूल्य
ठरणार आहे. राष्ट्राच्या जडणघडणीत प्रत्येक व्यक्तीचा सिंहाचा वाटा असणार आहे .म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने मतदान करणे अगत्याचे असल्याचे आदित्य याने सांगितले. आठवड्यातील प्रत्येक रविवारी आदित्य समाजासाठी या वसुंधरेसाठी मातीसाठी आपला दिवस सद्भावनेने सत्कारणी लावतो. पाच वर्षांमध्ये आपण ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल विधानसभा असेल अथवा लोकसभा असेल आपण सर्वांनी मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे . सोमवार दि 13 मे रोजी लोकसभेचे मतदान होत आहे. आपण सजक आणि सुज्ञान नागरिक आहोत. आपला अमूल्य वेळ इतरत्र वाया न घालवता राष्ट्र उभारणीसाठी मतदानातून अमूल्य वेळ दिलाच पाहिजे. आपल्या मतातून राष्ट्र उभारणी करण्यास हातभार लावूया असे आव्हान तमाम शिर्डी लोक मतदार संघात
“एक दिवस मातीसाठी एक दिवस मतासाठी” असे आव्हानच त्यांनी केले. मी मतदान करणार, तुम्ही पण करा ! आणि इतरांना सांगा. कारण दानात श्रेष्ठदान मतदान हेच आहे. समाजात असे अनेक सूर्य आहेत जे या अंधकाराला दूर करण्यासाठी काम करीत आहेत. आपणही या सत्कार्यात सहभागी होवुयात!
