तृतीयपंथियांचा सर्वसमावेशक विचार करणारे सरकार हव ;
व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवत तृतीयपंथी करणार शंभर टक्के मतदान :- दिशा पिंकी शेख

चला मतदानाने राष्ट्र घडवूया !

संगमनेर / लोकवेध live न्यूज / भारत रेघाटे

लोकशाही आणि संविधानाचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे. मतदानावरच लोकशाही आणि संविधान बळकट करीत त्याचे संवर्धन, रक्षण आणि संरक्षण करण्यासाठी आपण
सर्वांनीच पुढे आले पाहिजे त्यासाठी आम्ही शासनाच्या निर्मितीमध्ये सहभाग घेत आहोत. तृतीयपंथियांचा विकास आणि शैक्षणिक धोरण संदर्भात गांभीर्याने विचार करणारे सरकार हव आहे असे मत तृतीयपंथीयांची प्रतिनिधी दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केले. पुढे त्या असेही म्हणाल्या की, प्रत्येक व्यक्तीने मतदानाचा अधिकार बजावून तो अबाधित ठेवावा. मतदान केलेच पाहिजे, आपला तो हक्क आहे, अधिकार आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघात सोमवार 13 में रोजी मतदान होत आहे. या मतदार संघात
16 लाख 77 हजार 335 असे एकूण मतदान आहे. त्यापैकी जास्तीत जास्त संख्येने मतदान व्हावे असे त्या म्हणाल्या. प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या आवाहनास आपण प्रतिसाद दिला पाहिजे. नागरिकांमध्ये सजगता वाढीस लागावी आणि मतदान कण्यास प्रवृत्त करण्यासाठी शासन स्तरावर अनेक संकल्पना राबवल्या जातात त्या कृतीत उतरल्या पाहिजेत. शिर्डी मतदार संघामध्ये पुरुषांची 8 लाख 64 हजार 573 तर स्त्रियांची 8 लाख 12 हजार 684 मतदार संख्या असून तृतीयपंथीयांची 78 एवढी मतदार संख्या आहे. या संदर्भात दिशा पिंकी शेख हीस मतदान अधिकाराबाबत विचारणा केली असता त्या म्हणाल्या की, व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखत 100% मतदान तृतीयपंथी करणार असून तृतीयपंथीयांमध्ये महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे समर्थक आहेत. तसेच मी उत्कर्षा रूपवते यांच्या वंचित बहुजन आघाडीची पुरस्कर्ती
असून त्यांच्या विचाराला दिशा देण्यासाठी काम करीत आहे. या संदर्भात समस्त तृतीयपंथींचा पाठिंबा उत्कर्षा रूपवते यांना देणार का ? असे विचारले असता त्या म्हणाल्या की, मतदान हे गुप्त असते आणि म्हणूनच व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा कदापिही कोणीही प्रयत्न करू नये. माझे व्यक्तिगत मत मी जाहीर केले. परंतु मी तृतीयपंथीयांची प्रतिनिधी
या नात्यांने माझ्या सहयोगींना त्यांच्या विचाराचा आदर राखत त्यांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवत तृतीयपंथीयांच्या समुदायांनी
आपापल्यापरीने स्वेच्छने मतदान करावे. मतदान 100 प्रतिशत करावे असा आग्रह त्यांनी धरला. तृतीयपंथी शंभर टक्के मतदान करणार असे दिशा पिंकी शेख म्हणाल्या. तृतीयपंथींयामध्ये एकूण 78 मतदान आहे. तर
आठ लाख 64 हजार 573 पुरुषांचे व स्त्रियांचे आठ लाख 12 हजार 684 एवढे मतदान असून राष्ट्र घडविण्यात मतदानाचे योगदान मोलाचे असून एका मताने उमेदवार विजयी होऊ शकतो अथवा पराजीतही होऊ शकतो असे त्या म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!