रीडर ने रायडर व्हावे ; अभ्यासक पवन भट्टड
वाचन प्रकियेतील समस्यांचे केले निराकरण
संगमनेर / लोकवेध live न्यूज / भारत रेघाटे
वाचनाने बौद्धिक कक्षा रूंदावल्या जातात.
डीजिटल युगामुळे वाचन संस्कृती लोप पावण्याची भीती व्यक्त केली जात असून गरजे पुरते, सोयीनुसार गुगल वर सर्च करून वेळ मारून नेण्याचा प्रकार सर्सास वाढत चालला असून ह्या मर्यादा घातक ठरू पाहत आहेत. दरवर्षी नव्वद हजार पुस्तके प्रकाशित केले जातात. त्यामध्ये समाज, साहित्य
धर्म, गु्न्हे, पर्यटन ऐतिहासिक, भौगलिक, आदि विविध विषयावर पुस्तके उपलब्ध आहेत आपली भूख जेवढी आहे त्यापेक्षा जास्त वाचले पाहिजे. तर दुसरीकडे शिक्षण थांबल्यानंतर वाचन कमी होते. तसेच वाचन प्रक्रियेत कंटाळा, सवय आदि अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत त्यावर मात करता आली पाहिजे असे
मौलिक मार्गदर्शन स्पीड रीडिंग सेमिनार प्रसंगी पवन भट्टड यांनी केले.
मालपाणी लॉन्स येथे
रोटरी क्लब ऑफ संगमनेर यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
करणयात आले होते. भट्टड यांनी मुले आणि पालकांना मार्गदर्शनाच्या वेळी सेल्फ डेव्हलप होता आले पाहिजे असे सांगत प्रत्येक व्यक्तीने साधारण वर्षांमध्ये शंभर पुस्तके वाचावीत. तसेच असा संभ्रम निर्माण होतो की, आपण नेमके काय वाचले पाहिजे ? त्यासाठी क्युरेसिटी वाढवा, आवडता विषय घ्या असे ते म्हणाले. संपादक, विचारवंत, वकील, प्रोफेसर आदींचे वाचन सातत्याने होतच असते. परंतु प्रत्येक व्यक्तीने किमान दिवसातून अर्धा तास तरी वाचन केलेच पाहिजे असेही ते म्हणाले. व्यावहारिक जीवनात पुस्तके उपयुक्त ठरतात. माणसासारखेच पुस्तके असतात ती छोटी, मोठी, जाड अशीच असतात. खरे अनुभव हे पुस्तकेच देतात. गतीशिवाय जीवनात मजा नाही पुस्तके हे डोळे उघडे ठेवूनच वाचावे लागतात तर स्वप्न बंद डोळ्यांनी बघता येतात असे भट्टड म्हणाले. स्पीड ही पद्धत आहे, त्यास टार्गेट करू नका. स्पीड महत्त्वाचा नव्हे तर तो ज्ञात होणे गरजेचे आहे. माणसाच्या आयुष्यात आणि जीवनात परीक्षा काय आहे हे गुड मेमरी आणि बॅड मेमरीवर अवलंबून असल्याचे त्यांनी नमूद करीत अवयव, हेल्थ, वेळ, संबंध अशा अनेक विषयावर भट्टड यांनी मौलिक संवाद साधला. इतिहासाचे अभ्यासक संतोष खेडेकर म्हणाले की, सामाजिक उपक्रमाची व्याख्या बदलत आहे. उच्च दर्जाचे काम रोटरी क्लबच्या माध्यमातून होत आहे. पैशाने समृद्ध न होता वाचनाने समृद्ध व्हा ! समाजतत्त्वाची जाणीव झाली पाहिजे असे सांगत आपल्या वयाच्या पुढे शून्य ठेवून पुस्तके वाचावीत असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. संजय राठी यांनी प्रास्ताविकात म्हणाले की, वाचनाने ज्ञान, संवाद आणि कौशल्यात, वाढ होते. दुसऱ्यांच्या विचारात आपणास जाता येते. डिजिटलमुळे वाचन कमी झाले असून त्याला मर्यादा निर्माण झालेले आहेत. रोटरी क्लब ऑफ संगमनेर विषयी माहिती दिली. स्पीड रीडिंग सेमिनार मध्ये पालक आणि विद्यार्थ्यांना नवीन शिकायला मिळाल्याने
एक वेगळाच उत्साह आनंद चेहऱ्यावर दिसून येत होता. रोटरी क्लब ऑफ संगमनेर यांनी राबवलेल्या उपक्रमाचे सर्वांनी भरभरून कौतूक केले. रोटरीचे अध्यक्ष आनंद हासे, रोहित नावंदर, रमेश पावशे, भरतभूषण नावंदर यांचे मोलाचे योगदान लाभले. मधुसूदन कारवा यांनी आभार मानले.
