सुनंदाताई चव्हाण (नाशिक) यांचे जीवनविद्या आणि विचारांचे सामर्थ्य या विषयांवर अत्यंत मोलाचे मार्गदर्शन

नाशिक / लोकवेध live न्यूज / निलेश शेकोकार 

जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र वरळीच्या नामधारीका श्रीमती शोभा किशोर मुंज आणि मुंज परिवार यांनी १३/०४/२४ रोजी त्यांच्या मूळ गावी महापुरूष देवालय मंदिर, पातरवाडी, घोडगे, कणकवली येथे सद्गुरूंच्या सतशिष्या नामधारिका सौ. सुनंदाताई चव्हाण (नाशिक) यांचे जीवनविद्या आणि विचारांचे सामर्थ्य या विषयांवर अत्यंत बोधप्रद असे मार्गदर्शन आयोजित केले होते, गावातील प्रमुखांनी सदर उपक्रमाचे कौतुक करुन प्रत्यक्ष भेटुन अशा विचारांची जीवनामध्ये अत्यंत गरज असुन पुन्हा कार्यक्रमाची मागणी केली.
तसेच मुंजताईंच्या नविन घरी १४/०४/२४ रोजी सामुदायिक उपासना यज्ञ ऐश्वर्यात संपन्न झाला, सदर कार्यक्रमासाठी ३५ नामधारकांची उत्तम अशी व्यवस्था मुंज परिवार आणि इतर नातेवाईक शेजारी यांनी सेवा केली, त्याबद्दल वरळी ज्ञानसाधना केंद्राच्या वतीने मुंज परिवाराची शाल श्रीफळ देऊन कृतज्ञता व्यक्त केली, सदर कार्यक्रमासाठी ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे मनापासून खुप खुप आभार, धन्यवाद*

*आपले सर्वांचे*
*जीवनविद्या मिशन*
*ज्ञानसाधना केंद्र, वरळी*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!