परमार्थ हा निष्ठावंतांचा आहे – ह भ प महंत रामगिरी महाराज
कनकापूर येथे सप्ताहाची काल्याच्या कीर्तनेने सांगता
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
परमार्थ हा निष्ठेने करा एक दिवस परमेश्वर भेटल्या शिवाय राहणार नाही परमार्थ हा निष्ठवंताचा असून निसटून घेणाऱ्यांचा नाही
मनात शुद्ध भाव असावा लागतो
शुद्ध प्रकाशात सेवन करण्यासाठी केलेला प्रसाद म्हणजे काला. ज्या भोजनात प्रसन्नता आहे, त्याला प्रसाद म्हणतात. काला हे ऐक्याचे प्रतीक असल्याचे
प्रतिपादन ह भ प महंत रामगिरी महाराज यांनी केले
सद्गुरु गंगागिरीजी महाराज व ब्रम्हलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाआशिवार्दाने व महंत रामगिरीजी महाराज, गोदावरी धाम मठाधिपती, सरला बेट यांच्या मार्गदर्शनाखाली
गणपती मुर्ती, विठ्ठल रुख्मिणी माता, खोकल्याई देवी, महादेव पिंड, दक्षिणमुखी पवनपुत्र हनुमान मुर्ती, गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज पादुका व दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा सातवा वर्धापन दिन सोहळ्या निमिताने पंचदिनी हरीनाम हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संगमनेर तालुक्यातीतील श्री क्षेत्र कनकापुर, संपन्न झाला
या सप्ताहाकाळात रोज सकाळी काकडा भजन सकाळी ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन हरिपाठ रात्री पाच दिवस विविध कीर्तनकारांची कीर्तन संपन्न झाली कीर्तनानंतर रोज भाविकांसाठी महाप्रसाद कार्यक्रम होत असे सोमवार दि १८ रोजी सकाळी १२ वा
ह.भ.प. महंत रामगिरीजी महाराज यांचे काल्याचे किर्तन झाले व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन सप्ताहाची सांगता झाली
सप्ताह काळात गावातील तरुणांनी व जेष्ठ व्यक्तींनी सर्व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले
यावेळी समस्त ग्रामस्थ कनकापुर व पंचक्रोशितील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते
