काळाबरोबर प्रत्येकाने बदलणे गरजेचे आहे – महंत रामगिरी महाराज 
 शिव ओमकार पॅलेस मंगल कार्यालयाचा उद्घाटन समारंभ संपन्न 
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
  सरला बेटाशी निष्ठा असणारा थोरात हा परिवार आहे  संसार करत असताना प्रत्येकाने काळाबरोबर  बदलणे गरजेचे आहे अनेकांचे संसार उभा करण्याचे काम मंगल कार्यालय करेल अशी अपेक्षा आहे  आहे त्यामुळे आपल्या संसाराला साथ मिळण्यासाठी थोरात परिवाराने सुंदर मंगल कार्यालय उभे केले आहे या मंगल कार्यालयाचा व लॉनसाचा लाभ घ्यावा या परिवाराने मुलांवर चांगले संस्कार केले आहे असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी शिव ओमकार पॅलेस व लॉन्स आणि गुरुकुल या वास्तूच्या वास्तुशांतीच्या  उद्घाटन प्रसंगी केले
 संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथे थोरात परिवाराच्या वतीने उभारण्यात आलेले भव्य शिव ओंकार पॅलेस या मंगल कार्यालयाचे उद्घाटन शनिवार दिनांक 29 रोजी सायंकाळी सहा वाजता मोठ्याथाटामाटात संपन्न झाले
 यावेळी महंत रामगिरी महाराज यांची सुंदर सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीने  त्यांचे स्वागत करण्यात आले
 यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत आ बाळासाहेब थोरात रामगिरी महाराज उंबरेश्वर आश्रमाचे महंतदत्तगिरी महाराज, मंत राजेश्वरी गिरी महाराज,कंचनताई थोरात इंद्रजित थोरात दुर्गाताई तांबे जयश्री ताई थोरात लोणीच्या माजी सरपंच प्रभावती घोगरे, गाभा शकुंतला थोरात,शरयुताई देशमुख मैथिली ताई तांबे रणजितसिंह देशमुख प्रतापराव ओहळ राजेंद्र पिपाडा बुवाजीबाबा पुणेकर मंडलिक महाराज, शंकरराव खेमनर रामहरी कातोरे अजय फटांगरे  सुभाषराव थोरात सुनील थोरात शिवतेज थोरात ओम थोरात ओमकार थोरात ज्ञानदेव थोरात अनिल थोरात संदीप नागरे, चंद्रकांत थोरात रमेश थोरात  आधी सह जोर्वे गावातील व जोर्वे पंचक्रोशीतील तसेच संगमनेर तालुक्यातील राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
आ थोरात म्हणाले कि शेतीला जोड व्यवसायाची असली पाहिजे यासाठी सुरेश सुभाष व सुनील या तिघा भावानी एकत्र येऊन  मंगल कार्यालय व लॉन्स जोर्वे सारख्या ग्रामीण भागात उभे केले आहे भाऊसाहेब थोरात यांना भक्कम साथ देण्याचे काम जगन्नाथ आणि दत्तू थोरात यांनी दिली तर आता मला त्यांची मुले सुरेश  सुभाष आणि सुनील या तिघांनी दिली नायनगिरी महाराज यांचे थोरात कुटुंबीयांचे फार जुने  नाते आहे वास्तू खूप मोठी आहे संगमनेर मध्ये अनेक मंगल कार्यालय आहे मात्र ग्रामीण भागात हे भव्य दिव्य आणि अत्याधुनिक  मंगल कार्यालय उभे राहिले आहे थोरात परिवाराच्या पाठिमागे तुम्ही सर्वांनी उभे राहावे अशी अपेक्षा आ थोरात यांनी व्यक्त केली
oplus_0

दुर्गाताई थोरात राजेंद्र पिपाडा  यांनी आपल्या परिवारातील जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला
प्रभावती घोगरे म्हणाले की जुन्या काळात लग्न असेल की मंडप उभा राहायचा मात्र आता सर्व सुविधांयुक्त मंगल कार्यल्यात वहावे असे ग्रामीण भागात मंगल कार्यालय उभे करण्याचे काम थोरात परिवाराने केले आहे आणि थोरात परिवाराने गरीब कुटूंबातील शेतकऱ्याच्या मुलामुलींच्या लग्नासाठी सवलत द्यावी अशी विनंती केली आता परपरिगत शेतीबरोबर उद्योग व्यवसाया कडे वळावे
डॉ जयश्री थोरात म्हणाल्या की आपल्या असतAसध्या परिसरातील लग्नासाठी थोरात परिवाराने जे मंगल कार्यालय आणि लॉन्स सुरू झाले आहे याचा परिसरातील नागरिक याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आता या लोनसला मुलांची नावे दिले परंतु पुढील जे कार्यालय तयार करा तेव्हा मुलींचे नावे द्या अशी सूचना केली
 या मंगल कार्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे उद्घाटनाच्या अगोदरच 15 लग्नाच्या तारखा बुक झाल्या आहेत
Oplus_0
स्वागत आणि प्रास्ताविक संजय गांधी निराधार योजनेचे माजी तालुकाध्यक्ष आणि शिर्डी विधानसभेचे नेते सुरेश थोरात यांनी केले
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पर्बत यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!