कनोली विद्यालयात बाल दिंडी व वृक्ष दिंडी कार्यक्रम संपन्न
पिंपरणे / लोकवेध live न्यूज 

संगमनेर तालुक्यातील कनोली येथील  मा.श्री.भा. स.थोरात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कनोली विद्यालयामध्ये बालदिंडी आणि वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात होते या प्रसंगी अनेक मुलानी आणि मुलींनी पारंपरिक वारकरी वेश परिधान करून आणि हातात टाळ, मृदुंग घेऊन दिंडीत सहभाग घेतला. लेझीम आणि  झांज पथकाने सर्वांचे मन वेधून घेतले . विठू नामाचा जयघोष करत दिंडी कनोली वरून कनकापूर येथे नेण्यात आली. कनकापूर ग्रामस्थांनी दिंडीचे भव्य स्वागत केले. विठ्ठल-रुक्मिणी बनलेल्या मुलांचे पूजन करण्यात आले. कनकापूर ग्रामस्थांनी सर्वांसाठी अल्पोपहाराचे नियोजन केले. यावेळी कनकापूर गावच्या सरपंच सौ. ज्योती पचपिंड ,पोलीस पाटील संतोष शिंदे. आबा शिंदे, उपसरपंच   लहाणू शिंदे, स्कूल कमिटी अध्यक्ष सीताराम वर्पे, साखर कारखाना संचालक मीनानाथ वर्पे, कनोली गावचे पोलीस पाटील नानासाहेब वर्पे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी वर्पे,  ग्रामपंचायत सदस्य बंडू वर्पे, अमृतवाहिनी बँकेचे संचालक शिवाजी जगताप, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य गौतम जगताप, दूध संस्था संचालक राजू वर्पे, मदन वर्पे, ज्ञानदेव वर्पे, मस्तान शेख तसेच कनोली व कनकापूर परिसरातील ग्रामस्थ,महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. सूत्रसंचालन थोरात सर यांनी केले तर आभार प्राचार्य वर्पे के. एम.सर यांनी मानले. या प्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी   उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!