गुलाब राजे भोसले यांच्या वाढदिवसा निमित्त खूप खूप शुभेच्छा 

 संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी गावचे सुपुत्र गुलाब राजे भोसले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
बिरवाडी येथील पांडुरंग भोसले यांच्या पोटी 1-7-1989 मध्ये गुलाब राजे यांनी जन्म घेतला.
अवघ्या वयाच्या 17 व्या वर्षी गुलाब राजे यांना शिवसेना शाखाप्रमुख पद देण्यात आले, शाखा प्रमुखाचे काम बघत असताना गणप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली, पठार भागामध्ये मोठ्या वाड्या वस्ती असताना युवा सेना उप तालुका प्रमुख, युवा सेना तालुकाप्रमुख, शिवसेना तालुका संघटक, असे पद भूषवली .
तर गुलाब राजे यांनी आपल्या सर्व आयुष्य गोरगरीब जनतेचे देण्याचा ठरवलं , कोरोना काळामध्ये बाप मुलाजवळ, आणि मुलगा बापाजवळ जात नाही हे बघायला भेटलं, परंतु सर्व गावांवर संकट असताना देखील, आपल्या मुलाबाळांचा विचार न करता गुलाब राजे भोसले यांनी, आपलं सर्व आयुष्य पणाला लावून कोरोना झालेल्या लोकांना हॉस्पिटल पर्यंत पोहोचवून त्यांना नवीन जीवदान दिले, तर 32 अंत विधी त्याच्या हाताने त्यांनी केले याच कामाची पावती म्हणून त्यांना कोरोना योद्धा पुरस्कार दिला गेला.
आज देखील गुलाब राजे हे एखाद्या गरीबाचा लग्न, वाढदिवस किंवा अंत्यविधी असेल तर त्या कार्यक्रमांमध्ये, आवर्जून उपस्थित असतात.
राजकारणा पलीकडे एक वेगळीच मैत्री म्हणून गुलाब राजे भोसले यांच्याकडे बघितले जातात , नवनिर्वाचित अहमदनगर दक्षिणचे खासदार लोकनेते निलेश लंके यांनी रात्री कॉलवरून शुभेच्छा देत राजे यांना बोलावून घेत आदर्श करत त्यांचा सत्कार आयोजित केला गेला.
तर यापुढे मी माझा आयुष्य सर्व जनतेसाठी समर्पित करत आहे , असं देखील गुलाब राजे भोसले यांनी सांगितलं.
थोड्या काळात जिल्हा परिषद साठी गुलाब राजे भोसले यांची वर्णी लागणार का अशी चर्चा आता साकुर. पठार भागामध्ये सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!