*पिंपरणे गावाचे सुसंस्कृत उगवते नेतृत्व; शुभम देशमुख ( भाऊराजे )*

महाराष्ट्र हे ‘कार्यकर्त्यांचे मोहोळ’ असल्याचे वक्तव्य महात्मा गांधींनी केले होते.राजकीय, सामाजिक,पर्यावरणविषयक किंवा कोणतेही महत्त्वाचे आंदोलन असो;महाराष्ट्र आणि मराठी माणूस राष्ट्रपातळीवर चळवळीच्या नेहमी अग्रभागी जाणारा लढवय्या म्हणून ओळखला जातो.या पुरोगामी नेतृत्त्वाचा इतिहास थेट चक्रधर,ज्ञानोबा-तुकोबां छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर,यांच्या नंतर अनेक क्रियाशील कार्यकर्त्यानी आणि लोक नेतृत्वाने इथपर्यंत आणला,पण,गेल्या काही वर्षांत सारे चित्र बदलले आहे.आंदोलने रस्त्यावर कमी आणि सोशल मीडियावर जास्त लढली जाते आहेत.दुसरीकडे चळवळींकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोनही जाणीवपूर्वक बदलविला जातांना दिसतो.भांडवलशाही,बाजारकेंद्री व्यवस्था आणि बदलती मूल्ये यामुळे जनआंदोलनांचे स्वरूपच पूर्णपणे बदलले आहे. राजकारणातील प्रत्येकाने तत्वांशी आणि विचारांशी इमान राखत राजकारण केले पाहिजे असा विचार ज्यांच्या विचारातून झिरपत राहतो ते म्हणजे पिंपरणे येथील सामाजिक कार्यकर्ते शुभम देशमुख ( भाऊ राजे ).आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..

तरुणांनी नेहमी राजकारणात असतांना आपले चारित्र्य जपले पाहिजे आणि आपला सामाजिक पिंड बळकट ठेवला पाहिजे
शुभम यांना लोक प्रेमाने आणि आपुलकीने भाऊराजे या टोपणनावाने नावाने ओळखतात होण्याचा मान मिळविला तेथुच यांची लोकसंग्राहक लोक नेतृत्व बनायला सुरवात झाली.
महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, माजी खासदार सुजय दादा विखे पाटील यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून भाऊराजे यांची ओळख आहे तसेच भाऊराजे यांचे प्रेरणास्थान म्हणून बी जे खताळ पाटील तसेच विक्रम सिंह खताळ पाटील
यासह असंख्य श्रेष्ठीच्या आणि राज्यातील भाजपा जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा मध्ये सक्रिय असुन त्यांची वाटचाल आहे जनसेवेतुन समाधान एक प्रकारे त्यांनी सिद्ध केले आहेत त्यांचा निष्कलंक आणि निर्मळ स्वभाव या पदाला साजेसा आहे.तसेच राजकीयदृष्ट्या अहमदनगर जिल्ह्यात महत्वपूर्ण असलेल्या पिंपरणे गावचे ते भावी नेतृत्व आहेत.
शोषित वंचित आणि दुर्लक्षित घटकांच्या- उत्तुंग स्वप्नांची पुर्तता करतांना जनता परिवाराच्या स्वप्नांच्या पूर्ततेलाच त्यांनी आपलं भाग ध्येय समजले आहे.
मृत्युलोकीं आम्हा आवडती परी! नाहीं एका हरिनामें विण!!
विटलें हें चित्त प्रपंचापासूनि!वमन हें मनी बैंसलेंसे !!धृ!!
सोनें रुपें आम्हा मृत्तिके समान!माणिकें पाषाण खडे तैसे!!
तुका म्हणे तैशा दिसतील नारी!रिसाचियापरी आम्हा पुढे !!

अशा या तुकोक्ती प्रमाणे त्यांचा स्वभाव आणि संन्यस्थ वृत्तीचे जीवन निश्चितच आम्हा नवयुवकांना प्रेरणादायी दिशादर्शक आहे.त्यांच्या शुभेच्छामुळेच अनेकांची माणुस बनण्याची प्रक्रिया आरंभ होते‌.

चळवळींनी लोकांना अनेक गोष्टी शिकवल्या.जमीन हा आपला अधिकार आहे हे लोकांच्या मनावर बिंबवण्यात चळवळींचे योगदान आहे.देशाचे राजकारण जसे संसद भवनातून चालते तसचं रामलीला मैदानावरून,जंतरमंतर आणि आझाद मैदानावरून बिघडलेले राजकारणी वठणीवर येऊ शकते सर्वसामान्य लोकांच्या आशा आकांक्षा चळवळीच पुढे नेतात.ज्या सर्व जाती,धर्म,पंथ यांना एकत्र घेऊन मानवसमूहाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात त्यांनाच ते चळवळी म्हणून संबोधतात.धर्माच्या नावाखाली ज्या तथाकथित चळवळी चालतात त्यांना ते ‘धार्मिक उन्माद’ हाच शब्द वापरतात सगळ्यांना चळवळीतल्या कामकाजाबद्दल सारे काही कळावे याकडे त्यांचा कटाक्ष असतो.लोकांपासून काहीतरी झाकून ठेवलये असे होऊ नये. कारण ‘लोक आणि स्वतःचे चारित्र्य’ हेच चळवळींचे भांडवल असते.अशा प्रकारच्या भांडवलास शक्यतो कोणी तडा जाऊ देत नाही.
खासगीकरणाचा सामना करण्यासाठीच लोकांनी जाणून घेतले पाहिजे जनमताचा रेटा लोकशाहीत महत्त्वाचा असतो! आंदोलनाच्या ठिकाणी जेव्हा संख्या दिसते तेव्हा ते लढे यशस्वी होतात.येणाऱ्या काळात चळवळींपुढे जागतिकीकरण, उपभोगवाद या गोष्टींचा सामना करून गोरगरीब,वंचितांचे हितसंबंध कसे टिकवायचे हा मुख्य प्रश्न असेल.संपत्तीकेंद्री रुंदावलेल्या राजकारण वाढत गेले तरी यथार्थ चळवळी त्यांना योग्य वेळी योग्य दिशेला नेतील,त्यावर काही प्रमाणात अंकुश लावू शकतील असे मला वाटते. दिनदुबळ्यांच्या पाठीशी उभे राहणारे शुभम देशमुख सारख्या नेतृत्वाच्या पाठीशी गावातील शोषित वंचित दुर्लक्षित घटकांनी उभे राहण्यास हवे ह्याच अपेक्षा.
नेहमी लोकांच्या सुख दुःख समयी सदैव तत्पर असलेले भाऊराजे म्हणजे जवळपास उपभोगशुन्य स्वामीच आहे आर्थिक,सामाजिक कौटुंबिक अशा कोणत्याही क्षेत्रात वावरतांना त्यांचा इतरांशी संपर्क येत असतो अशावेळी सुसंवाद साधल्यास कार्याला गती मिळते नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाची जवळीक साधत नाही,मनुष्य हा तिरस्कार भावनेच्या आधारे जगु शकत नाही,तो प्रेमाच्या आधारावर भक्कम उभा राहतो असा आत्मविश्वास आणि नेहमी सकारात्मक विचार मांडणारे मा.शुभम देशमुख .आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने…
महसूल मंत्री विखे पाटलांच्या माध्यमातून अनेक गरजवंत लोकांना सहकार्य करणारे मग त्यात दवाखाना असो कोर्ट कचेरी असो किंवा कागदपत्रांचे काम असो अनेकांच्या सुख दुःख ‌समयी नेहमी धावून येत असतात अतिशय संवेदनशील असलेल्या दोस्तीच्या पर्वातील नवा अध्याय रचणारा तळमळीचा कार्यकर्ता,ज्याच्या जीवनात पैश्याला नेहमी दुय्यम स्थान आहे.
पैसा मिळविला की माणूस सुखी होतो अशी आज प्रत्येकाची विचारसरणी झालेली दिसून येते त्यासाठी जो तो त्वरित पैसा कसा कमवावा याचाच विचार करताना दिसतो मग संपत्तीच्या मागे पळणारा माणूस माणुस्कीला विसरतो पण पैसा हे फक्त साधन आहे हे तो विसरतो,विकत घेतलेल्या ‌सर्वच वस्तू मानसिक सुख देतील असे नाही पैश्यापेक्षा मानवता महत्वाची असे अशी माणूसपणाची भिंत जपणारे शुभम (भाऊराजे ) म्हणजे जवळपास उपभोगशुन्य स्वामीच…

वाढदिवस एका युवा नेतृत्वाचा..
वाढदिवस एका संयमी मनाचा..
वाढदिवस एका उज्वल भविष्याचा..
वाढदिवस समतामुलक अभियानाचा..
वाढदिवस एका मनाच्या श्रीमंतीचा…
वाढदिवस एका कुशल संघटकाचा..
वाढदिवस एका सुसंस्कृत विचाराचा..
वाढदिवस एका विशाल नम्रतेचा..
वाढदिवस आपल्या माणसाचा..
वाढदिवस आमच्या भाऊचा..
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा साहेब
Wish You Happy Birthday..

*शब्दांकन : पत्रकार सुभाष भालेराव*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!