जयश्रीताई अहिरे यांच्या प्रयत्नांमुळे मिळाला जेष्ठ वृद्ध नागरिकाला न्याय व हक्क….

नाशिक / लोकवेध live न्यूज / निलेश शेकोकार 

सदर घटना अशी आहे की…..
बरेच दिवसापासून एक वृद्ध व्यक्ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी नातेवाईकांनी ऍडमिट केला होता व त्याचा उपचारही पूर्ण झाला होता परंतु अमानुष प्रकार असा घडला की नातेवाईकांनी त्या वृद्ध व्यक्तीला संभाळण्याचा आपल्याला नाहक त्रास होईल या भीतीपोटी तो व्यक्ती संबंधित हॉस्पिटलमध्ये सोडून दिला व तेथील जाऊन पळ काढला डॉक्टरांच्या वारंवार कॉल करूनही त्या व्यक्तीला ते लोक घेण्यासाठी येत नव्हते व त्याची जबाबदारी स्वीकारण्यास तयार नव्हते हा व्यक्ती आमचा कोणी नाही आम्ही याला घ्यायला आज येतो उद्या येतो असे डॉक्टरांना वारंवार सांगत गेले डॉक्टर राजेंद्र यांनी सदर घटना म्हसरूळ पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षक ढवळे साहेब यांना सांगितली परंतु तरीही त्या व्यक्तीचे नातेवाईक त्या रुग्णाला भेटायला यायला तयार नव्हते व नेण्यासाठी तयार नव्हते पोलिसांनी त्यांना तुमच्यावरती सदर गुन्हा दाखल होईल ही गंभीर बाब नातेवाईक लक्षात घेण्यास तयार नव्हते .
हॉस्पिटल मधील उपस्थित एका व्यक्तीने डॉक्टरांना जयश्री ताई अहिरे मॅडम यांच्या संदर्भात माहिती दिली डॉक्टरांनी ताबडतोब जयश्री ताई यांच्याशी संपर्क साधला. व सदर बाब त्यांच्या कानी घातली.. जयश्रीताई अहिरे यांनी मग संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला सदर घटना दोन्ही बाजूची जाणून घेतली आणि आपल्या युवा क्रांती फाउंडेशनच्या माध्यमातून युव ती प्रदेशाध्यक्ष या अधिकाराच्या नात्याने संबंधित व्यक्तीशी चर्चा करून तुम्ही तुमच्या रुग्णाला अर्थात तुमच्या ज्येष्ठ नागरिकाला वृद्धला तुमच्या घरी घेऊन जा संबंधित पोलीस स्टेशनचे संपर्क साधून पोलीस निरीक्षक ढवळे साहेब व डॉक्टर राजेंद्र साहेब यांच्यात संयुक्त चर्चा करून ज्येष्ठ वृद्धा व्यक्तीला पूर्णपणे बरे करून नातेवाईकांच्या हवाली करण्यात आले व त्यांना बजावून सांगण्यात आले ज्येष्ठ व्यक्तीला जर कुठे सोडाल किंवा त्याला त्रास द्याल तर तुमच्यावरती कठोर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच या व्यक्तीची व्यवस्थितपणे निगा राखणे तुमची जबाबदारी आहे तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून दूर जाऊ नये असे समजावून सांगून वृद्ध, तसेच पोलीस, डॉक्टर, व रुग्णाचे नातेवाईक, यांच्यातील संयुक्त वाद हा जयश्रीताई अहिरे यांच्या माध्यमातून मिटवण्यात आला व योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी जयश्रीताई अहिरे नेहमीच कटीबद्ध असेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!