कानिफनाथ वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेत डंका
शाळेतील चार विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादित
संगमनेर / लोकवेध live न्यूज
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी घेतलेल्या पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून निळवंडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानिफनाथ वस्ती तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील चार विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड झाली असून शाळेचा निकाल देखील 100% लागला आहे . गुणवत्ता यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कु.साईनाथ तुकाराम पवार, कु.प्रथमेश शिवनाथ आहेर, कु.आरव मच्छिंद्र पाटोळे कु. श्रेया तात्यासाहेब पवार या चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
कु.साईनाथ तुकाराम पवार हा राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती साठी पात्र ठरला असून संगमनेर तालुक्यात प्रथम आला आहे तर कु.प्रथमेश शिवनाथ आहेर, कु.आरव मच्छिंद्र पाटोळे कु.श्रेया तात्यासाहेब पवार या विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे याबद्दल सर्व स्तरातून शाळेचे अभिनंदन करण्यात येत आहे.
कानिफनाथ वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांची दरवर्षी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत निवड होत असते.शाळेतील सलग पाच वर्षापासून गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांची निवड होत आहे.
या विद्यार्थ्यास शाळेतील मार्गदर्शक शिक्षिका श्रीम. संगिता पाटोळे व व श्री. अशोक हांडे यांनी शाळेच्या वेळेव्यतिरिक्त सुट्टीच्या दिवशीदेखील जादा तास घेऊन विद्यार्थ्यास मार्गदर्शन केले.याचाच परिणाम म्हणून शाळेचा पट देखील उच्चांकी वाढला आहे.चालू वर्षात शाळेतील 3 विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयसाठी निवड झाली आहे. त्याचप्रमाणे मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत देखील शाळेतील 7 विद्यार्थी चमकले आहेत.
कु.साईनाथ, कु.प्रथमेश, कु.आरव कु. श्रेया यांच्या या यशाबद्दल निळवंडे गावातील सरपंच सौ.शशिकलाताई पवार, उपसरपंच श्री.भाऊसाहेब जनार्दन आहेर, श्री.प्रभाकर पवार, श्री.दिपक पवार, सौ.सुनंदा पवार व सर्व सदस्य ग्रामपंचायत निळवंडे, तंटा मुक्ती अध्यक्ष श्री.शिवाजी आहेर, श्री.उत्तम गणपत पवार, श्री.प्रकाश पंढरीनाथ पवार, सामाजिक कार्यकर्ते श्री.सुनिल उकिर्डे, श्री.बाळासाहेब पंढरीनाथ पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.राजेंद्र हरिभाऊ पवार, उपाध्यक्ष सौ.मोनाली शरद पवार, शाळा व्यवस्थापन समिति सदस्य, सर्व पालक व ग्रामस्थ, सर्व संस्थांचे पदाधिकारी यांनी कु.साईनाथ, कु.प्रथमेश, कु.आरव, कु.श्रेया यास शुभेच्छा दिल्या. तसेच कु.साईनाथ, कु.प्रथमेश, कु.आरव, कु.श्रेया व कानिफनाथ वस्ती शाळेचे संगमनेर पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री.अनिल नागणे, गटशिक्षणाधिकारी श्री.बाळासाहेब गुंड, शिक्षण विस्तार अधिकारी श्री.दिपक त्रिभुवन, केंद्रप्रमुख श्रीम.आशा घुले तसेच वडगाव पान केंद्रातील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकानी अभिनंदन केले आहे.