सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालयात आषाढी वारी निमित्त विद्यार्थ्यांच्या पायी दिंडी सोहळ्याचे यशस्वी आयोजन
संगमनेर / लोकवेध live न्यूज
तालुक्यातील डिग्रज येथील विद्यालयामध्ये बुवाजी बाबा मंदिर ते डिग्रस पायी दिंडी सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले होते. पायी दिंडी सोहळ्याच्या रथाचे पूजन सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महंत बुवाजी बाबा पुणेकर महंत श्री उमाजी अहिल्याजी पुणेकर,श्री जानकीराम पुणेकर सचिव व ग्रामस्त यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वेशभूषा करून ग्रामस्थांची मने आकर्षित केली. विद्यार्थ्यांनी भगवान शंकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे, संत गाडगे महाराज त्याचप्रमाणे वासुदेव विठ्ठल – रुक्मिणी अशा विविध प्रकारच्या वेशभूषा केल्या होत्या . यावेळी विद्यार्थ्यांनी ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर करत डिग्रस गावामध्ये रिंगण सोहळा पार पाडला.
यावेळी लेझीम आणि झांज पथकांनी विविध प्रात्यक्षिक साजरी केली. गावातील ग्रामस्थ महिला आणि विद्यार्थ्यांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गवळणी व अभंग सादर करून गायनाच्या माध्यमातून ग्रामस्थांना आकर्षित करून घेतले .
पायी दिंडी सोहळ्यातील विद्यार्थ्यांना नाष्ट्याची सोय म्हणून सिद्धेश्वर महाराज देवस्थान च्या वतीने विद्यार्थ्यांना केळी वाटप करण्यात आले. तसेच डिग्रस गावामध्ये सुरेश शेठ उदावंत यांनी विद्यार्थ्यांना पोहे वाटप केले . व कानिफनाथ महाराज मंदिर संस्थान तर्फे विद्यार्थ्यांना पोहे वाटप करण्यात आले.
यावेळी सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिग्रस चे सर्व विद्यार्थी व शिक्षक तसेच मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.
यावेळी रवींद्र पुणेकर यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे यशस्वी पायी दिंडी आयोजनाबद्दल आभार मानले.कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक श्री बाचकर सर, खेमनर सर , दिवे सर , चिंधे मॅडम, पुणेकर मॅडम, पांढरे सर, पुणेकर मामा यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय शेंगाळ व महेंद्र पुणेकर यांनी केले.
