जोर्वे येथील लाडक्या बहिणींकडून मा डॉ खासदार सुजयदादा विखेंचे उत्स्फूर्तपणे औंक्षण करून व राख्या बांधून स्वागत
डॉ सुजय दादांना झाली धर्मवीर आनंद दिघे यांची आठवण
सांगमनेर / लोकवेध live न्यूज

आज जोर्वे येथे डॉ.सुजय दादा विखे पाटिल यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना कामकाजाबाबत आढावा घेण्यासाठी जोर्वे येथे अचानक भेट दिली जोर्वे येथील महिला भगिनींनी डॉ सुजय दादा यांचे औंक्षण करून आपल्या लाडक्या भावाला सर्व महिला भगिनींनी राखी बांधून सदर योजना सुरू करण्याबाबत समाधान व्यक्त केले

तसेच डॉ सुजय दादा हि आपल्या हातावर एवढ्या राख्या बघून आज मला खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिघे यांची आठवण झाल्याचे सांगून जोर्वे येथील जनसेवा ऑफिस मधून महायुती सरकारने सुरू केलेल्या सर्व लोकाभिमुख योजना आपले सर्वांचे कुटुंबप्रमुख ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटिल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचत असल्याने समाधान व्यक्त केले मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पोर्टल हि लवकरच सुरू होऊन ऑनलाईन अर्ज भरण्याचा अडथळा दुर होईल व गावातील २१ ते ६५ वयोगटातील माझी एकही भगिनी सदर योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या याबाबत कार्यकर्त्यांना सुचना देऊन मी स्वतः वेळोवेळी आढावा घेणार असल्याचे आश्वासन दिले

तसेच युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारणीसाठी लक्ष घालण्याची मागणी डॉ. सुजय दादा यांच्याकडे केली असता डॉ. सुजय दादा यांनी लगेच स्वतः जागेची पाहणी केली व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारणीसाठी लवकरच आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगताच जोर्वे येथील युवकांनी जल्लोष करून डॉ सुजय दादा यांचे आभार व्यक्त केले
अचानक भेट असतानाही यावेळी मोठ्या प्रमाणात युवक व महिला भगिनी उपस्थित होत्या

