रयत च्या लोणी विद्यालयाची तनिष्का चौरे इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम
निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज/अशोक गोसावी
नुकताच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या मार्फत घेतल्या जाणाऱ्या इ. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात लोणी येथील रयत शैक्षणिक संकुलातील तब्बल ४३ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र होऊन विद्यालयाने नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. या निकालातील विशेष बाब म्हणजे विद्यालयातील ६ विद्यार्थ्यांनी पूर्व माध्यमिक राज्य गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केलेले आहे. महाराष्ट्र राज्यातील पहिल्या ५ विद्यार्थ्यांमध्ये विद्यालयाच्या २ विद्यार्थ्यांनी स्थान प्राप्त करून राज्यपातळीवर विद्यालयाचा नावलौकिक पोहचविला आहे.
विद्यालयातील इ ८ वी ची विद्यार्थीनी कु.तनिष्का हेमंत चौरे हीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे , कुऱ्हे तेजस नवनाथ याने महाराष्ट्र राज्यात पाचवा क्रमांक, बुचुडे निसर्ग सचिन याने महाराष्ट्र राज्यात बाविसावा क्रमांक , नैतिक राहुल ब्राम्हणे व कौस्तुभ महेश पन्हाळे या दोघांनी महाराष्ट्र राज्यात चोविसावा क्रमांक तर प्रज्ज्वल शिवाजी सोमवंशी याने महाराष्ट्रात २६ वा क्रमांक प्राप्त केला आहे. विद्यालयाचे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ९ तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल ३४ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झालेले आहेत.
इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत विरेन विजय शिंदे, आदित्य सचिन अंत्रे , कु.ऋग्वेदी संतोष ठाणेकर,फैसल हमराज सय्यद , अथर्व सचिन दळवी ,समर्थ दत्तात्रय पठारे, श्लोक सचिन चासकर , गौरव दादासाहेब जाधव, श्रीराम सुरेश भालेराव हे विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहे.तर इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत तनिष्का हेमंत चौरे,तेजस नवनाथ कुऱ्हे,निसर्ग सचिन बुचुडे,नैतिक राहुल ब्राह्मणे ,कौस्तुभ महेश पन्हाळे,प्रज्वल शिवाजी सोमवंशी,कु.समिक्षा सुधाकर कडू ,श्लोक प्रकाश जोंधळे,कु.वेदांती विनायक झावरे,अवधूत दिपक बनसोडे,प्रथमेश अजित मापारी,साईराज संतोष निकम , प्रणव मिनानाथ भोईर ,अर्णव योगेश पन्हाळे,कु. प्रांजल विवेक गिरी ,हर्षद नितीन चव्हाण,साईकृष्ण सुनिल दंडवते,अथर्व प्रविण पावडे,कु. विद्या प्रदिप शेळके,गौरव आप्पासाहेब मोरे,अजिंक्य तान्हाजी तांबे ,अथर्व संदिप नाईक,ओमकार संदीप आव्हाड ,दर्शन रविंद्र लोखंडे ,कु.गौरी संजय बुऱ्हाडे ,कु. स्नेहा प्रविण शिरसाठ ,सुजय सुहास बिडवे,ओम प्रकाश वराडे,श्रेयस नंदकुमार दिघे,अथर्व सुनिल सिनारे, भक्ती शरद मनकर,सानिकेत आण्णासाहेब मगर,कस्तुरी राहुल मापारी,श्वेता अविनाश बनसोडे हे विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले आहेत.
रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागात इयत्ता ८ वी वर्गातील सर्वाधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र होण्याचा सलग ८ वर्षाचा विक्रम ह्याही वर्षी अबाधित ठेवण्याचे काम स्पर्धा परीक्षा विभाग लोणी यांनी केलेले आहे.यामुळेच हा स्पर्धा परीक्षा पॅटर्न जिल्ह्यात वैशिष्ठ्यपूर्ण ठरत आहे. या विभागात काम करणारे स्पर्धा परीक्षा विभागप्रमुख सचिन पलघडमल इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष काम करणाऱ्या विभाग प्रमुख श्रीम. गलांडे एम आर, इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रमुख मार्गदर्शक विभाग प्रमुख श्रीम ढोकणे पी डी, गणित विषयाचे शिक्षक साळवे आर एस, इ. ५ वी च्या वर्गशिक्षिका व गणित विषय शिक्षिका श्रीम. जाधव ए.बी. व ,बुद्धिमत्ता चाचणी विषय शिक्षक व इ. ५ वी वर्गशिक्षक पवार आर सी, यांनी या परीक्षेचे काम उत्कृष्ठपणे पाहिले आहे.
विद्यालयाच्या या गौरवशाली यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी, सर्व मार्गदर्शक तसेच इतर सर्व सहकारी शिक्षक वृंद आणि सेवाभावी सेवक वृंद, कुशल प्रशासन कौशल्य लाभलेले विद्यालयाचे प्राचार्य रक्टे एल.सी.,पर्यवेक्षिका श्रीमती.कडू एस.आर. यांचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पा.,मॅनेजिंग कौंसिल सदस्या मीनाताई जगधने, जनरल बॉडी सदस्य एकनाथराव घोगरे पाटील,उत्तर विभागीय अध्यक्ष आ.आशुतोष दादा काळे ,विभागीय अधिकारी बोडखे साहेब, सहा.विभागीय अधिकारी तोरणे साहेब व नाईकवाडी साहेब,स्थानिक स्कूल कमिटी सदस्य बाळासाहेब विखे पाटील,स्थानिक स्कूल कमिटी सदस्य व सरपंच जनार्धन घोगरे पाटील व उत्तमराव आहेर पाटील तसेच रयतप्रेमी पालकांनी अभिनंदन केले.