सात्रळ नगरी भरली विठ्ठल नामाची शाळा

निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोकगोसावी 

रयत शिक्षण संस्थेचे, नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय सात्रळ येथे राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत तसेच आनंददायी शनिवार माझी शाळा माझा उपक्रमाचा एक भाग म्हणून वृक्षदिंडी चे आयोजन करण्यात आले होते.
वृक्षदिंडीत विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा तसेच काही विद्यार्थ्यांच्या गळ्यात पखवाद,हातातील टाळ वाजवत विठ्ठलाचे नामस्मरण करत झाडे लावा झाडे जगवा अशा घोषणा देत सात्रळचा परिसर दणाणून सोडला होता.
विशेष म्हणजे दोन लहान मुलांनी माऊली विठ्ठल रखुमाईचे जणू काय रुपच धारण केले होते.कमरेवर हात ठेवून भजन कीर्तन तसेच तुकाराम महाराजांच्या वृक्षावल्ली आम्हा सोयरे असे अभंग म्हणणा-यांना जणू काही आशीर्वाद देत होते.
वृक्षदिंडी सोहळा यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र बडे पर्यवेक्षिका सुशिला थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख देवीदास थोरात,सतिश नालकर, शिवदास सातपुते, विलास गभाले,वैभव वसावे, सच्चिदानंद झावरे, प्रकाश कुलथे, युनूस पठाण, त्रिंबक राशिनकर,केशव मुसमाडे, ज्ञानदेव लेंडे,संजय दिघे,प्रा.विलास दिघे,प्रा.पंकज दिघे,प्रा.आण्णासाहेब गोर्डे,प्रा.सतिश कदम,प्रा.विश्वास घुगे,प्रा.दातीर,गितांजली गोसावी, सुनिता ढोकणे, संगिता सांगळे,प्रविणाताई दिघे,कावेरी वदक, प्रमिला पंडोरे,रत्नाकर सोनवणे, ज्ञानदेव माळी, रामदास साबळे,राजू पेटारे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!