हिवरगाव पठार चे सोपान डोळझाके यांची युवक काँग्रेसच्या संगमनेर तालुका उपाध्यक्षपदी निवड.

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठारचे सुपुत्र सोपान डोळझाके यांची संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड केली गेली.
सध्या पठार भागामध्ये जनतेचे अडलेले कामे हे सोपानराव हे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयामार्फत करणार आहे. तर या निवडी मागे संगणमेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर , कारखान्याचे संचालक इंद्रजीत पाटील खेमनर ,तसेच अघटीत कामगार तालुका अध्यक्ष जयराम ढेरेंगे यांचा मोलाचा वाटा आहे असं सोपानराव डोळझाके यांनी सांगितल आहे. येणाऱ्या अडीअडचणीमध्ये मी साकुर पठार भागातील जनतेचे कामे यशोधन पर्यंत नेऊन मार्गी लावण्याचे काम करेल असं सांगितले आहे . तर सोपानराव यांच्या यशस्वी कामे मागे त्यांचे चुलते संतोष डोळझाके हे देखील गोरगरीब जनतेचे कामे करत आहे. तर सोपान डोळझाके यांची निवड झाल्याबद्दल. साकूर पठार भागाच्या वतीने तसेच हिवरगाव पठार येथील ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा आहे त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लवकरच सोपान डोळझाके यांना प्रमाणपत्र देऊन पुढे काम करण्याची संधी देण्यात येणार आहे अशी माहिती देखील यशोधन कार्यालय मार्फत मिळाली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!