घरासमोर कपडे धुत असलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला ; बिबट्याच्या हल्ल्यात महिला जागीच  ठार 
 संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे 
       घराच्या बाहेर ओट्यावर कपडे धुत असणाऱ्या महिलेवर अचानक गिन्नीगवतात दबा धरून बसलेल्या बिबट्यान प्राण घातक हल्ला केला. या हल्ल्यात निमगाव टेंभी येथील रहिवासी असणाऱ्या संगीता शिवाजी वर्पे वय ४३ ही महिला ठार झाली असल्याची घटना बुधवारी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या वाजण्याच्या सुमारास निमगाव टेंभी शिवारातील जाखुरी रोड वरील वर्पे वस्तीवर घडली
     संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी गावातील जाखुरी रोडवर असणाऱ्या वर्पे वस्तीवर शिवाजी रतन वर्पे हे आप ल्या  पत्नी संगीता शिवाजी दोन मुलांसह राहत आहे आज बुधवारी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास संगीता या घराच्या ओट्यावर कपडे धूत होत्या त्या वेळी गिन्नी  गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्या मानेला पकडत प्राण घातक हल्ला केला ही  घटना त्यांचे दीर ज्ञानदेव वर्पे आणि प्रवीण वर्पे
यांनी पाहिली त्यानंतर त्यांनी बिबट्याच्या दिशेने धाव घेत भाऊजई संगीता हिला सोडविण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्याने तिच्या मानेला पकडून थेट गिन्नी गवतात ओढत नेले त त्यानंतर त्या बिबट्याला हटविण्यासाठी प्रवीण वर्पे यांनी ट्रॅक्टर गिंन्नी  गवतात घातला असता त्या बिबट्याने जखमी अवस्थेत त्या महिलेला सोडून दिले आणि धूम ठोकली
    बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर  जखमी झालेल्या संगीता वरपे यांना नातेवाईकांनी तात्काळ शहरातील डॉक्टर प्रवीण कुमार पानसरे यांच्या धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले होते मात्र उपचारा पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी जाहीर केले सदर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात आणला जोपर्यंत वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी येत नाही तोपर्यंत आम्ही मृत्यदेह  ताब्यात घेणार नाही  असा पवित्रा मयत महिलेच्या नातेवाईकांनी व निमगाव टेंभी  ग्रामस्थांनी घेतला त्यानंतर संगमनेर उपविभागाचे उपविभागीय  वनाधिकारी संदीप पाटील आणि वनक्षेत्रपाल सचिन लोंढे वनपाल संगीता कोंढार वन परीक्षक मंडळ चैतन्य कासार  हे घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात आले  त्यावेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थ व नातेवाईकांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले या बिबट्यांना नेमके कुठे सोडले जाते पिंजरा लावला तर त्याचं खाद्य ठेवतात का आपल्या परिसरात बिबटे किती आहे बिबट्यांची नसबंदी केली जाते का यासारख्या एकामागे एक प्रश्नाचा भडीमार करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले
भाजपचे संगमनेर विधानसभा प्रमुख अमोल खताळ हेही घटनास्थळी आले त्यांनी सदरचे प्रकरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कानावर घातले आहे त्यांनी वनविभागाला आव श्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर घटना घडलेल्या ठिकाणी आम्ही पिंजरे लावले आहे त्या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त केला जाईल असे आश्वासन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर मयत महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!