परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयाच्या वतीने आमदार बाळासाहेब थोरात यांचा सत्कार
संगमनेर / लोकवेध live न्यूज
महाराष्ट्राच्या कृषी, साहित्य, सहकार ,समाजकारण, शिक्षण या सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देताना राज्य मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाची खाते भूषवताना या सर्व खात्यांना लोकाभिमुख करणारे विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य तथा काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते आमदार बाळासाहेब थोरात यांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल, परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पिंपरणे यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.बापूसाहेब देशमुख, उपाध्यक्ष मा. दिलीपराव देशमुख सचिव मा. कैलासशेठ काळे संचालक मा. सुरेशराव ठोंबरे, प्राचार्य रमेश वाळे ,मा.राजेंद्र देशमुख मा.नवनीत देशमुख, श्री एकनाथ विरकर सर, श्री बी यु थोरात सर याप्रसंगी उपस्थित होते.
