सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित वाणिज्य महोत्सव उत्साहात संपन्न

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

वाणिज्य विभागाअंतर्गत वाणिज्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाअंतर्गत निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा (quiz) रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, फनी गेम्स (मॅनेजमेंट गेम) आणि पोस्टर व मॉडेल प्रेसेंटेशन या उपक्रम राबविण्यात आले होते. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सह सेक्रेटरी श्री. दत्तात्रय चासकर, प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील सर, उपप्राचार्य प्रो.डॉ. बी. डी. वाघ, डॉ. विलास कोल्हे, डॉ. भाऊसाहेब रणपिसे, डॉ. राजेंद्र जाधव, वाणिज्य विभाग प्रमुख प्रो. डॉ. व्ही. बी. बैरागी, वाणिज्य मंडळाचे चेअरमन प्रा. गणेश थोरात आदी उपस्थित होते. या महोत्सवाचे उद्घाटन डॉ. भाऊसाहेब रणपिसे पी. व्ही.पी. कॉलेज लोणी, डॉ. राजेंद्र जाधव के. जे. सोमय्या कॉलेज कोपरगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी बोलताना डॉ. भाऊसाहेब रणपिसे यांनी वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांना सल्लागार क्षेत्रात विविध संधी असल्याने विद्यार्थ्यांनी त्यासाठी जागृत होणे गरजेचे असल्याचे सांगितले.

यावेळी डॉ. राजेंद्र जाधव म्हणाले आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कौशल्याधिष्ठित क्षेत्रात अधिक महत्त्व प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांनी विविध कौशल्य आत्मसात करावी व आपल्या करिअरची दिशा निश्चित करून पुढील वाटचाल करावी असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील यांनी वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित या महोत्सवाचे महत्त्व विशद करताना विद्यार्थ्यांनी महोस्तवांतर्गत आयोजित केलेल्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे सह सेक्रेटरी श्री दत्तात्रय चासकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून आपण जे काही कराल त्यामध्ये सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करावा यातून आपल्याला यश संपादित करता येते असे मत व्यक्त केले. या महोत्सव अंतर्गत आयोजित विविध कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाणिज्य विभागातील प्रा. निलोफर तांबोळी, प्रा. रुपाली कदम, प्रा. अजय कांगुणे आदिनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका दीपिका सोनवणे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रा. महेश हजारे यांनी व्यक्त केले. या सर्व उपक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला.

वाणिज्य महोत्सव अंतर्गत आयोजित विविध स्पर्धांना उपप्राचार्य डॉ. विलास कोल्हे तसेच उपप्राचार्य डॉ. बी.डी. वाघ हे उपस्थित राहुन विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध उपक्रमांचे परीक्षण केले. याप्रसंगी महोत्सवात आयोजित केलेल्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची पारितोषिके देऊन प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!