कनोली येथील थोरात विद्यालयात दप्तर मुक्त शाळा व आनंददायी शनिवार संपन्न
संगमनेर / लोकवेध live न्यूज
शनिवार दि 28/9/2024 रोजी माननीय . श्री भाउसाहेब संतुजी थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक . विद्यालय कनोली या विद्यालयात दत्तरमुक्त अभियानांतर्गत आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत योगशिक्षक व विद्यालयाचा माजी विद्यार्थी शिवप्रसाद वर्पे याने विद्यार्थ्यांना योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखविले व योगासनांचे जीवनात किती महत्व आहे हे समजावून सांगितले याप्रसंगी गुरुकुल बाथळेश्वर येथील विद्याथ्याचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभले. सर्व माध्यमिक व प्राथमिक च्या विद्यार्थ्यांनी उत्तमरीत्या प्रतिसाद दिला
