शेंडी बीटातील कातळापुर व‌ शेंडी केंद्र शिक्षक मित्र परिवाराकडून डॉ.श्रीनिवास पोतदार यांचा सत्कार

शेंडी ( भंडारदरा ) – लोकवेध live न्यूज 

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका बीट देवठाण मधील जिल्हा परिषद टाकळी केंद्रशाळेचे मुख्याध्यापक व उपक्रमशील पदवीधर शिक्षक डॉ. श्रीनिवास विजय पोतदार यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत इतिहास विषयात मानद पीएच.डी.अर्थात विद्यावाचस्पती डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे अकोले तालुका शिक्षण विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. डॉ.‌ पोतदार यांच्या या सुयशाचे औचित्य साधून शेंडी बीट सन्माननीय शिक्षण विस्तार अधिकारी तथा अकोले तालुका गटशिक्षणाधिकारी मा. श्री.अभयकुमार वाव्हळ, केंद्रप्रमुख मा. श्री. तुकाराम एरंडे यांच्या संकल्पनेतून कातळापुर व शेंडी केंद्रातील शिक्षकांनी इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय वारंघुशी येथे संपन्न झालेल्या शिक्षण परिषदेचे औचित्य साधून डॉ. श्रीनिवास पोतदार यांचा शेंडी बीटातर्फे यथोचित सत्कार केला. या प्रसंगी शेंडी व कातळापुर केंद्रातील सर्व जि.प. शाळा व माध्यमिक विद्यालयांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.‌ कार्यक्रमादरम्यान डॉ. पोतदार यांच्या यशाबद्दल व‌ त्यांनी विविध शाळांमधून केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल केंद्रप्रमुख श्री. तुकाराम एरंडे, धोंडू मुंढे, भागवत लेंडे, महानंदा कहाणे व लोटे सर यांनी मनोगत व्यक्त केले.‌‌ सत्कारमूर्ती डॉ पोतदार यांनी शेंडी बीटातील शिक्षक मित्र परिवाराला मनापासून धन्यवाद देत कृतज्ञतापूर्वक सर्वांचे आभार मानले. तसेच आपल्या मनोगतातून ब्रिटिशकालीन नाशिक जिल्ह्याचे प्रशासन एक अभ्यास सन १८६९ ते १९४७ या पीएच.डी. संशोधन विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी सादर केली. याशिवाय बावीस वर्षांच्या नोकरी काळातील शैक्षणिक प्रवासाला व पेसा क्षेत्रातील आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. बाळू दराणे, अंकुश सोनवणे, धोंडू मुंढे, भाऊ गंभीरे, भाऊसाहेब भांगरे, जगदीश झडे, भागवत लेंडे, रामदास सुकटे, मधुकर भांगरे, किसन दराणे, रोहिदास जाधव, राजू सुकटे, सुनिल वेडे, पांडुरंग बारामते, भास्कर तातळे, लोटे सर, प्रमोद चिखले, करवंदे सर, श्रीमती खिलारी मॅडम, कहाणे मॅडम, भोकनळ मॅडम, सुनिता भागडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!