व्हॉइस ऑफ मीडिया संगमनेर शाखेची बैठक संपन्न
विविध विषयांवर करण्यात आली चर्चा
संगमनेर / लोकवेध live न्यूज
व्हॉईस ऑफ मीडिया संगमनेर तालुका शाखेची बैठक शासकीय विश्रामगृह येथे सोमवारी जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीत विविध विषयावर साधक-बादक चर्चा करण्यात आली

व्हाईस ऑफ मिडिया या आंतरराष्ट्रीय पातळीवरील पत्रकार संघटनेच्या मासिक बैठकीचे संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजन करण्यात आले होते या बैठकीला जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने उपाध्यक्ष बाळासाहेब गडाख सचिव अमोल मतकर खजिनदार गोरक्ष नेहे कार्यवाहक भारत रेघाटे तालुकाध्यक्ष बाबासाहेब कडू उपाध्यक्ष सतीश फापाळे सचिव सचिन जंत्रे अर्जुन आरगडे नवनाथ गाडेकर सुभाष भालेराव सुखदेव गाडेकर यांच्यासह सदस्य उपस्थित होते
या बैठकीत सर्वप्रथम घटनेच्या राज्य कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रियेने निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून निवडीचे स्वागत करण्यात आले.
शिर्डी येथे पत्रकार भवन होण्यासाठी महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र देण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला तसेच पत्रकारांना रेशन कार्ड देण्यासाठी तसेच आधार लिंक करण्यासाठी संघटनेच्या वतीने प्रयत्न केले जाईल असे ठरले तसेच गणेश विसर्जन झाल्यानंतर नदीपात्रात उघड्यावर पडलेल्या गणेश मूर्ती गोळा करून त्याची विसर्जन करून स्वच्छता अभियान राबवण्याचे या बैठकी मध्ये ठरले पत्रकारांचे आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचेही या बैठकीत ठरले या बैठकीत अनेक सदस्यांनी पदाधिकाऱ्यांनी सूचना केल्या त्या स सूचनांचे जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांनी समर्पक उत्तरे दिली उपस्थित त्यांच्या आभार संघटनेचे सचिव सचिन जंत्रे यांनी मांनले
